Articles History

गणेशाचे खरे डोके कापल्यानंतर कोठे गेले? काय आहे या मघील रहस्य! जाणून घ्या संपूर्ण माहिती

गणपती बाप्पा हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. गणपती बाप्पाच्या जन्माची देखील  कथा देखील खूप रंजक आहे. ती कथा सर्वाना माहीत आहे .  भगवान शंकर व पार्वती हे कैलास पर्वतावर राहत असे. भगवान शंकर एकदा पृथ्वी भ्रमणासाठी गेले. माता पार्वती पर्वतावर एकट्याच होत्या. त्यांना स्नान करण्यासाठी जायचे होते. पण दरवाज्याजवळ कोणीच अंग रक्षक नव्हता. तेव्हा त्यांनी स्वतच्या शरीराच्या मळीपासून  एक सुंदर मूर्ती बनविली. त्या मूर्तीला जीवदान दिले. एक सुंदर बालक माता पार्वती समोर येऊन उभा राहील. माता पार्वती त्या सुंदर बालकाला पाहून अगदीच हरकून गेली. तिने त्या बालकाला दरवाज्या  जवळ थांबण्यास सांगितले. त्या बालकाला एक सूचना देखील दिली मी स्नान करण्यासाठी जात आहे.

काहीही झाले तरी कोणालाही आतमध्ये प्रवेश देऊ नकोस. मी जेव्हा आतमधून बाहेर येईल तेव्हाच तू दारवाज्यांजवळून हलायचे. असे सांगून माता पार्वती स्नान करण्यासाठी गेल्या. तो बालक अगदी प्रामाणिकपणे काम करू लागला. तो दरवाज्याजवळ  जाऊन थांबला. काही वेळेनंतर भगवान शंकर तेथे आले. त्यांनी आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या लहान बालक भगवान शंकर यांना आता प्रवेश करूनच देत नव्हता.नंदी व इतर सहकारी लोकांनी त्या बालकांला खूप समजावले पण तो काही दारांजवळून हालतच नव्हता.

मग भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी त्या  क्रोधात त्या बाळकांचे मस्तकच उडविले. काही वेळेत माता पार्वती तेथे आल्या त्यानी जेव्हा त्या बालकाचे धड शरीरा वेगळे पाहिलर तेव्हा माता  पार्वती जोर -जोरात रडू लागल्या त्या प्रचंड दुखी झाल्या. भगवान शकरांवर देखील क्रोध करू लागल्या. तुम्ही माझ्या पुत्राला पुन्हा जीवंत करा अन्यथा मी संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेल.

भगवान शंकर देखील चिंतेत पडले. त्यांनी नंदी व इतर काही अनुयाणा  जंगलात पाठविले. व कोणत्याही एका प्राण्याचे धड घेऊन येण्यास संगितले. नंदी व इतर सर्व अनेक जागेवर फिरले परंतु त्यांना कोणत्याच प्राण्याचे धड मिळाले नाही. त्यांनी फार प्रयत्न केले ,परंतु तसे होऊ शकले नाही. शेवटी त्यांना एक हत्ती दिसला ते त्याचे मस्तक घेऊन भगवान शंकर यांच्याकडे आले.

भगवान शंकर यांनी ते मस्तक पाहिले, त्यांना थोडेसे वेगळे वाटले. माता पार्वती तर फारच नाराज होत्या.शेवटी त्या हतीचे मस्तक त्या बालकांच्या धडाला जोडले. भगवान शंकर यांनी त्या बालकाचे नामकरण बाल गणेश असे केले. गणेश यास अनेक शक्ति प्रधान केल्या. ही सर्व कथा आपल्या सर्वाना माहीत आहे ,परतू गणपती बाप्पाचे आधीचे मस्तक कोठे आहे हे आपणास माहीत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत हे मस्तक नेमके कोठे आहे या विषयी सविस्तर माहिती.

गणपती बाप्पाचे आधीचे मस्तक एका गुहेत ठेवण्यात आले आहे. असे मानले जाते. पाताल भुवनेश्वर असे त्या जागेचे नाव आहे. येथे गणपतीची जी एक मूर्ती आहे ,त्या मूर्तीस आदी गणपती म्हटले जाते. कसयुगात या गुहेचा शोध आधीशांकर यांनी लावला आहे. ही गुहा भारतातच असून, उतराखंड या राज्यातील पिथौरागढ़ जवळील  गंगोलीहाट  पासून 14 किलोमीटर अंतरावर ही गुफा आहे. येथील मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीची रक्षा भगवान शंकर स्वता करतात. असे देखील मानले जाते. अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या आधीच्या डोक्याचे देखील  जतन करून रक्षण करण्यात आले आहे.  गणपती बाप्पा हे अगदी लहानांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांचे आवडते दैवत आहे.