“ISRO” चे संस्थापक यांच्या बद्द्ल तुम्हाला या गोष्टी माहित आहे का ?

0
485
Being Maharashtrian
Being Maharashtrian

Loading...

१५ ऑगस्ट ला एक चित्रपट प्रदर्शित होतोय ,”मिशन मंगल”, असं म्हटलं जातंय की हा चित्रपट ISRO या संस्थेच्या “mars orbiter mission ” वर आधारित आहे. आणि आज आहे १२ ऑगस्ट म्हणजेच “ISRO” चे संस्थापक ” विक्रम साराभाई” यांची १०० वी जयंती !!

Loading...

आजकाल अनेक प्रोग्रॅम , चित्रपट आपण पाहतो ते गरिबीतून वर आलेल्या आणि काहीतरी भव्यदिव्य केलेल्या लोकांच्या जीवितकार्याला वाहिलेले असतात पण

Loading...

Loading...

याचा अर्थ ज्याचं बालपण सुखात गेलं आहे त्यांचं पुढील आयुष्य प्रेरणादायी नसतं का? नाही, असं मुळीच नाहीये कारण हलाखीतून पुढे जाणाऱ्यांसाठी पथदर्शक असते त्यांची परिस्थिती पण सुखात बालपण गेलेल्या किंवा सुखवस्तू घरातील मुलं-मुलींसाठी हीच परिस्थिती असू शकते “मार्गापासून भरकटून टाकणारी !”


पण अश्या परिस्थितीतून स्वतः ला भरकटू न देता , उण्यापुऱ्या ५२वर्षांच्या आयुष्यात , स्वतःलाच नाहीतर आपल्या मायभूमीला देखील एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवणाऱ्या ” दैदिप्यमान व्यक्तिमत्वाचं नाव होतं “विक्रम साराभाई”!!

सधन , गुजराती व्यापारी कुटुंबात जन्म घेतलेल्या विक्रम साराभाईंना लहानपणापासूनच गणित आणि शास्त्र विषयाची आवड होती आणि आपलं पुढील शिक्षणही त्यांनी शास्त्र शाखेत केलं आणि भारत स्वतंत्र होत असतानाच ते आपल्या मायदेशी परतले हातात PhD ची डिग्री आणि उरात ” आपल्या मायदेशाला अंतराळ क्षेत्रात उच्चस्थानी बसविण्याचं स्वप्न घेऊन !”.

पण दुर्दैवाने परमेश्वराने त्यांना उणंपुरं ५२ वर्षांचं आयुष्य दिलं होतं आणि तेव्हढ्याश्या कारकिर्दीत साराभाईंनी १ , २ नाही तर तब्बल ५ मोठ्या मोठ्या संस्थांची स्थापना केली आणि त्यातील महत्वाची संस्था म्हणजे ” Indian Space research organization “!!!
त्यांची ही गरुड झेप अजून काही काळ टिकली असती तर कदाचित भारत देखील विकसित देशांच्या रांगेत दिसला असता आणि कदाचित हेच कारण होतं

“३०डिसेंबर १९७२” रोजी अचानक झालेल्या ,चुटपुट लावणाऱ्या मृत्यूचं … विक्रम साराभाई यांना त्यांच्या १००व्या जयंतीनिम्मित मानाचा त्रिवार मुजरा…. !

Loading...