father and daughter

मुलीच्या भविष्यासाठी ‘या’ योजनेत गुंतवा पैसे : टॅक्समधील देखील मिळेल सूट

मुलींचे भविष्य जर तुम्हाला सुरक्षित करायचे असेल तर सुकन्या समृ​द्धि योजना हि खूप फायदेशीर आहे. यामध्ये उत्तम परतावा देखील मिळतो आणि त्याचबरोबर आयकरामध्ये सुटदेखील मिळते. तसेच पीएफ पेक्षाही यामध्ये परतावा जास्त मिळतो.
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर विभागाच्या कलम 80 क च्या अंतर्गत आयकरात देखील सूट मिळतो. त्याचबरोबर मॅच्युरिटीच्या रकमेवर देखील कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही.

गुंतवणुकीवर मोठा फायदा

सुकन्या समृद्धि योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आयकर विभागाच्या कलम 80 क च्या अंतर्गत आयकरात देखील सूट मिळते. हि आयकर सूट तुम्हाला ईपीएफ/जीपीएफ,सीपीएफ/एनपीएस से लेकर पीपीएफ/ईएलएसएस/एनएससी, लाइफ इंंश्योरेंसवर तसेच 5 वर्षांच्या एफडीवर देखील मिळते. 1 वर्षामध्ये तुम्ही दीड लाख रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आयकर द्यावा लागणार नाही.

sukanya-samriddhi-yojana
sukanya-samriddhi-yojana

मॅच्युरिटीवर आयकरात सूट
18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही यामधून 50 टक्के रक्कम तुम्ही काढू शकता. त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक मोठी फायद्याची असून वर्षाला जास्तीत जास्त तुम्हाला यामध्ये दीड लाख रुपये गुंतवणूक करता येऊ शकता.