Articles Festival

…म्हणून मकर संक्रांतीला पतंग उडवतात.

स्वच्छंदपणा मुक्ततेचे प्रतीक असलेल्या पतंगबाजीला मकर संक्रांतीच्या सणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.भारतामध्ये अनेक देशी खेळ खेळले जातात . त्यामध्ये पतंग बाजी हा एक रोमांचक खेळ मानला जातो.संक्रांतीच्या पतंग बाजी ची सुरुवात कशी झाली आहे हे  आज आपण जाणून घेणार आहोत.

पतंग वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यापासून बनवलेला , मांजा असलेला ,शेपटी व पंखा घातलेला ,वातावरणातील हवेपेक्षा जास्त वस्तुमान त्यामुळे हवेत  उडू शकणारा असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी ज्याला गुजरातमध्ये उत्तरायण असे म्हटले जाते त्यादिवशी पतंग उडवण्याची प्रथा अनेक वर्षांपासून पार पाडली जाते. सध्या काही वर्षांपासून या पतंग उडवण्याच्या परंपरेला मोठ्याप्रमाणात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे स्वरूप आले आहे व याचे एक वेगळेच आकर्षण परदेशी पर्यटकांमध्ये निर्माण झाले असून निरनिराळ्या देशांमधून परदेशी पाहुणे या पतंग महोत्सवाला हजेरी लावताना दिसून येते.  पतंगाचे पॉवर काईट .स्पोर्ट्स काईट असे निरनिराळे प्रकार सध्या अस्तित्वात आहेत .पतंगाची सुरुवात नक्की कुठून झाली हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे.

पतंग हे सर्वप्रथम आशिया खंडातच निर्माण करण्यात आले असे पुरावे आढळून आले आहेत. इंडोनेशियातील मुना  बेटांवरील गुहांमध्ये कागोटी या पतंगांचा उल्लेख आढळून येतो .या पतंगांचा उल्लेख इसवी सन पूर्व 9500 -9000 या काळातील आहे .त्या काळामध्ये पतंग हे मुख्यत्वे जंगलामध्ये उपलब्ध असलेल्या बांबू व अन्य पाने पाने इत्यादी साहित्याच्या आधारे बनवले जात.

भारतामध्ये पतंगाची ओळख ही ह्यु एनत्सांग  या चिनी प्रवाशांनी करून दिल्याची वर्णने प्रवास नोंदींमध्ये आढळतात. चीनमध्ये सुरुवातीला रेशमी तलम वस्त्र पासून पतंग बनवले जात. त्यानंतर कागद ,बांबूच्या काड्या इत्यादी पासून पतंग बनवण्याची प्रथा सुरू झाली. चीनमध्ये सुरुवातीला पतंग हे केवळ मनोरंजनाचे वा खेळाचे साधन म्हणून वापरले जात असे.हवेचा अंदाज घेणे, अंतर मोजणे व अन्य सैन्याशी संबंधित कार्य पार पाडण्यासाठी केला जात असे.

सुरवातीच्या काळामध्ये चीनमध्ये निर्माण केले जाणारे पतंग हे सपाट आणि आयताकृती आकाराचे असत.

चिनी मधून भारतीय संस्कृतीमध्ये रुजलेल्या पतंगांना नंतरच्या काळामध्ये फायटर काइटसचे स्वरूप देण्यात आले. फायटर काईटरचे मुख्यतः हि-याच्या आकाराचे असतात व त्यांना शेपटी नसते. भारतामध्ये झारखंड बिहार ,राजस्थान, गुजरात ,उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पतंग महोत्सव साजरा केला जातो. पतंग उडवताना मुख्यत्वे एक दुसऱ्याचे पतंग कापण्याचा प्रयत्न केला जातो व त्याला एक स्पोर्ट्समन स्पिरीट म्हणून बघितले जाते.

मुघलांच्या काळातही निरनिराळ्या खेळांसोबत पतंग उडवण्याचा शोक अनेक राजेरजवाडे यांना होता.

तालीबानी राजवट लागू होण्यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये पतंग उडवणे हा खेळ मोठ्या प्रमाणात उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जात असे व त्याला दरी हे नाव होते मात्र तालीबानी राजवट लागू झाल्यानंतर पतंगबाजी बंद करण्यात आली.

इंडोनेशियामध्ये पतंग उडवण्याकडे केवळ उत्सव किंवा मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता अधिकृत क्रीडाप्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे.बालीमध्ये खूप अनोख्या प्रकारचे पतंग तयार केले जातात .यामध्ये फुलपाखराच्या आकाराचे ,ड्रॅगन च्या आकाराचे असे विविध प्रकारचे पतंग बघायला मिळतात.

जपान मध्ये नवीन बाळाचा जन्म झाल्यावर त्या बाळाचे नाव लिहून तो पतंग.आकाशात उडवण्याची प्रथा अस्तित्वात आहे .जपानमध्ये मोठ्या वजनाचे व रुंदीचे पतंग निर्माण केले जातात. 

भारतामध्ये उत्तरायणच्या दिवशी पतंग महोत्सव न करता गणतंत्र दिवस, विश्वकर्मा पूजा, बसंत पूजा या दिवशीही पतंग महोत्सव केला जातो.

पतंग उडवताना पतंगाचा मांजा हा धारदार असल्यामुळे पक्षी व मनुष्यालाही इजा पोहोचण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच पतंग उडवले गेले पाहिजेत.