Articles Crime Featured National

जगातील सर्वात श्रीमंत गुन्हेगार ज्याने आपल्या मुलीला थंडी वाजते म्हणून जाळल्या होत्या नोटा :वाचून तुम्हाला बसेल धक्का

pablo escobar
pablo escobar

जगातील असा कोणताही भाग नाही जेथे गुन्हे घडत नाहीत. जगभरातील सर्वच देशांत मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असतात. यामध्ये सर्वात प्रगत देशांचा देखील समावेश आहे. एकापेक्षा एका जबरदस्त कुख्यात गुन्हेगारांनी आपल्या देशाला आणि जगभरातील सर्वच सुरक्षा यंत्रणांच्या नाकीनऊ आणले आहे. मात्र या सगळ्या गुन्हेगारांपैकी कोलंबियाचा पाब्लो एस्कोबार याने जगभरातील सर्वच देशाच्या यंत्रणांना कामाला लावले होते. त्याच्यासारखा गुन्हेगार या जगात कुणीही झाला नसेल. त्याच्या एकापेक्षा एक कारामतींनी जगभरातील सर्वात कुख्यात आणि कुप्रसिद्ध गुन्हेगार म्हणून त्याला ओळखले जात असे. आजच्या या लेखात आपण या कुख्यात गुन्हेगाराच्या करापतींची माहिती घेणार असून या लेखात आपण त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत.

पाब्लो एस्कोबार याच्याविषयी माहिती
जगातील कुख्यात गुन्हेगार असलेल्या या पाब्लो एस्कोबार याचा जन्म १ डिसेंबर १९४९ रोजी कोलंबियामध्ये झाला. त्याचे वडील पेशाने शेतकरी होते तर आई शिक्षिका होती. आपल्या ७ भावंडांपैकी तो तिसऱ्या क्रमांकावरील मुलगा होता. १० वर्षाच्या लहान वयातच त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले. इतक्या लहान वयातच त्याने अपहरण आणि खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे करू लागला. काही वर्षानंतर पाब्लोने मोठ्या प्रमाणात गुन्हे करण्यास सुरुवात केली. जगभरातील सर्वात कुख्यात आणि मोठ्या स्मगलर म्हणून तो ओळखला जाऊ लागला. त्याने आपला हा स्मगलिंगचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोलंबिया ते पनामा १५ वेळा हवाई प्रवास केला. आपला हा व्यवसाय सेट केल्यानंतर त्याने १५ मोठी विमाने आणि ६ हेलीकॉप्टर खरेदी केली. या सगळ्याच्या माध्यमातून तो कोलंबिया ते अमेरिका कोकेन पोहोचवत असे. एकदा सरकारने त्याला १८ किलो कोकेनसहित अटक केली होती. मात्र पाब्लो एस्कोबार या व्यवसायात इतका मुरला होता कि त्याने या केसमधील न्यायाधीशाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा न्यायाधीश विकला गेला नाही. मात्र त्यानंतर पाब्लोने त्याचा अतंत्य क्रूरपणे खून केला. त्यानंतर सरकारने हि केस करत पाब्लोची त्यातून सुटका केली.

वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत पाब्लो अमेरिकेतील ८० टक्के कोकेनचा व्यापारी होता. यासाठी तो पायलटला एका वेळचे पाच कोटी रुपये देत असे. त्याच्या या गुन्हेगारी व्यवसायातूनच त्याने मोठा प्रमाणावर पैसे देखील कमावले. मात्र याने या व्यवसायातून इतके पैसे कमावले कि त्याला ते बँकेत ठेवता येत नसत. त्यामुळे तो आपले पैसे मोठ्या गोदामांमध्ये ठेवत असे. १९८९ मधील फोर्ब्सच्या यादीनुसार पाब्लो एस्कोबार हा जगातील सातव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती होता. मात्र त्यानंतर त्याच्या लहान मुलाने फोर्ब्सला फोन करत तुम्ही आमच्या संपत्तीच्या जवळपास देखील पोहोचलेले नाहीत, असे घोषित केले. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता कि त्याच्याकडे किती पैसा होता. त्याच्याकडे असणाऱ्या पैशांपैकी ८ टक्के पैसे तर उंदीर आणि दुसरे प्राणी खराब करून जात असत.

एस्कोबारची कामे
पाब्लो एस्कोबार हा मूळचा मेंडोलिनचा होता. तेथील लोक त्याला चांगलेच ओळखत असतं. त्याच्या क्रूर चेहऱ्याचे आणि गंभीर गुन्ह्यांचे ते साक्षीदार होते. आपल्या गुन्हेगारी विश्वातून कमावलेल्या पैशांमुळे तो जगातील सातव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती म्हणून देखील ओळखला जात असे. अंदाजानुसार त्याची एकूण संपत्ती हि २५ अरब डॉलर इतकी असल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याची मुले जुआन आणि मैनुएला एस्कोबार हे सर्वात श्रीमंत वारसदार होते.

आपल्या साम्राज्याची उभारणी
पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबार याने लिहिलेल्या “द अकाउंटंट्स स्टोरी” या पुस्तकामध्ये त्याने गरिबीतून श्रीमंतीकडे कसा प्रवास केला याचे वर्णन करण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा कुख्यात गुन्हेगार असलेला पाब्लो आणि त्याची कंपनी मेडेलिन ड्रग कार्टेल एका दिवसात १५ टन कोकेनची तस्करी करत असे. याची किंमत अमेरिकेच्या आतमध्ये जवळपास काही बिलियन डॉलरच्या जवळपास असे. त्याच्या भावाने लिहिलेल्या पुस्तकामध्ये सांगण्यात आले आहे कि, त्याच्याकडे इतका पैसा होता कि, त्याचे पैसे बांधण्यासाठी केवळ आठवड्याला १ हजार डॉलर रबरांवर खर्च केले जात असतं. त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे होते कि, तो बँकेत ठेऊन शकत नसे. त्यामुळे त्याला हे पैसे गोदामात ठेवावे लागत असे. त्यामुळे या पैशांपैकी १० टक्के रक्कम हि केवळ रद्दी म्हणून नष्ट होत असे. त्याचबरोबर उंदरे देखील मोठ्या प्रमाणात त्याचे पैसे नष्ट करत असतं.

१९७५ मध्ये पाब्लो एस्कोबार याने आपला कोकेनचा व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील एका व्यवहारासाठी त्याने स्वतः विमान उडवत हा सौदा पूर्ण केला होता. त्यानंतर त्याने हे विमान तोडून आपल्या शेतातील गेटवर लटकावले होते. जगातील सर्वात मोठा कोकेनचा व्यापारी होता. मात्र फैबियो रेस्ट्रेपो नावाच्या आणखी एका कोकेन स्मग्लरची हत्या केल्यानंतर त्याची जगभरात आणखी दहशत निर्माण झाली. त्यानंतर त्याच्यासाठी काम करणाऱ्या सर्व लोकांना पाब्लो एस्कोबार याने आपल्याकडे कामासाठी ठेवले. मात्र कुख्यात गुन्हेगार आणि ड्रग्ज स्मग्लर असून देखील तो एक दिलदार व्यक्ती म्हणून देखील ओळखला जात असे.

गरिबांचा वाली
पाब्लो एस्कोबार हा कोलंबिया सरकार आणि अमेरिकेचा सर्वात मोठा दुश्मन होता. मात्र इतके सगळे असून देखील तो मेंडेलिन मधील नागरिकांसाठी देवदूत होता. पाब्लोने आपल्या शहरात अनेक चर्च बनवले. त्याचबरोबर रॉबिन हूड म्हणून देखील आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले होते.पाब्लोने १९७६ साली वयाच्या २६ व्या वर्षी १५ वर्षाच्या मुलीशी लग्न केले होते. मारिया विक्टोरिया असे त्याच्या पत्नीचे नाव होते. या दोघांना जुआन पाब्लो आणि मैनुएला पाब्लो असे त्यांची नावे होती. त्याने जवळपास ५००० एकरांमध्ये फैलावलेल्या भागात आपले आलिशान राज्य तयार केले होते. यामध्ये तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता.

जाळले होते १४ कोटी रुपये
पाब्लो एस्कोबारच्या मुलाने आपल्या एका मुलाखतीमध्ये पाब्लोचे आपल्या कुटुंबाप्रती असणारे प्रेम सांगितले होते. या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या वडिलांची हि गोष्ट सांगितली होती. आपल्याला मुलीला थंडी वाजत असताना त्याने एकदा मोठ्या प्रमाणात पैसे जाळले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे त्याने जाळले होते कि एका सामान्य माणसाला हे पैसे कमावताना त्याचे आयुष्य खर्ची करावे लागले असते. मात्र त्याने आपल्या कुटुंबासाठी पैशाची काहीही किंमत ठेवली नाही. एका आठवड्यामध्ये त्याची स्मगलिंगची कमाई हि 42 करोड़ डॉलरम्हणजेच जवळजवळ 2814 करोड़ रुपये होत असे. त्यामुळे त्याच्याकडे किती पैसे असतील याचा विचार न केलेलाच बरा.

त्याच्या कुटुंबाला वाजणाऱ्या थंडीमुळे त्याने जवळपास १४ कोटी रुपये जाळले होते. याविषयी अधिक माहिती देताना त्याच्या मुलाने सांगितले होते कि, त्याचे कुटुंब एकदा डोंगराळ भागात असताना त्याच्या मुलीला मोठ्या प्रमाणात थंडी वाजू लागली. त्यामुळे आपल्या मुलीला थंडी वाजू नये म्हणून त्याने जवळपास १४ कोटी रुपयांच्या नोटा जाळून आग निर्माण केली होती. त्यावेळी जगभरातील ८० टक्के कोकेनचा कारभार हा पाब्लो एस्कोबार करत असे. मात्र जगभरातील सर्वात कुख्यात स्मग्लर असून देखील तो एक कौटुंबिक व्यक्ती म्हणून देखील ओळखला जात असे. तो आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करत असे. मात्र जगभरातील सर्वात कुख्यात स्मग्लर असल्याने त्याच्या कुटुंबाला देखील त्याचा मोठा फटका बसत असे.

पाब्लो एस्कोबारचा अंत
जगभरातील सर्व सुरक्षा यंत्रणांना कामाला लावणाऱ्या या कुख्यात स्मग्लरचा अंत देखील फार भयानक पद्धतीने झाला होता. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधीच पाब्लो एस्कोबार याने आपला वाढदिवस साजरा केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी एका भयानक एन्काउंटरमध्ये त्याचा खात्मा झाला. १ डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या पाब्लोचा पोलिसांच्या चकमकीत २ डिसेंबर १९९३ रोजी मृत्यू झाला. त्याचा खात्मा केल्यानंतर अंक पोलिसानं त्याच्या मृतदेहाबरोबर फोटो देखील काढले होते.

जगभरातील सर्वात कुख्यात गुन्हेगार असलेल्या पाब्लो एस्कोबारचा अंत पोलिसांनी फार फिल्मी पद्धतीने केला होता. अनेकवेळा पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पाब्लो एस्कोबारचा अंत पोलिसांनी त्याच्या मुलाशी बोलत असताना केला होता. पाब्लो त्याच्या मुलाबरोबर फोनवर बोलत असताना त्याचा फोन टॅप कला आणि त्याचे ठिकाण शोधून काढत त्याच्यावर हल्ला करत त्याचा खात्मा केला.