पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने 

0
1075
padmashree-dr-ratan-rao-lane
padmashree-dr-ratan-rao-lane

पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने

माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब घरात झालेला जन्म, आई-वडील, पाच बहिणी आणि दोन भाऊ असे तब्बल दहा माणसांचे कुटुंब, शेतमजूर वडील अशा प्रतिकूलतेवर मात करीत घरातील एकमेव शिक्षित मुलगा ते एक लाख नेत्रशस्त्रक्रिया करणारा डॉक्टर.

दुसऱ्याच्या शेतावर दर रविवारी कापूस वेचणे आणि शेंगा> काढणे ही कामे करून एक रुपया मिळायचा. शाळेची मान्यता टिकण्यासाठी दहा मुले असली पाहिजेत हा नियम असल्यामुळे शाळेत जाण्याचे नशिबी आले. दहावीपर्यंत चार महिन्यांपेक्षा जास्तकाळ शाळेतच गेलो नाही. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आणि दहावीला जिल्ह्य़ात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो.

गावाला येण्यासाठी लाल डब्याची गाडीही नव्हती. १४ किमी पायी जावे लागायचे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेतला तरी सुरूवातीला एका कंडक्टरच्या घरी राहिलो होतो. खांद्यावर कावड घेऊन २५ खेपा असे ५० घागरी पाणी झाडांना देत असे. त्याचे महिन्याला ३० रुपये मिळायचे.

१९७६ मध्ये गावी आल्यानंतर आपल्यावर ११ हजारांचे कर्ज असल्याने तुझे शिक्षण बंद असे वडिलांनी सांगितले. मग, ‘एमबीबीएस’ला प्रवेश घेताना वसतिगृहामध्ये सात मुलांचा स्वयंपाक करायचो. हे काम करून माझे जेवण फुकट व्हायचे. खरे तर, मला हाडांचा किंवा लहान मुलांचा डॉक्टर व्हायचे होते. पण, डोळ्यांचा डॉक्टर झालो. ११ वी व १२ वी वैद्यनाथ महाविद्यालय, परळी येथे करून एमबीबीएस व नेत्रशास्त्रातील एम.एस.पदव्युत्तर पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथून मिळवली.

पुढे १९८५ पासून अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून रूजू झालो. आठ वर्षे विनम्र सेवा दिली.पुढे जे.जे रूग्णालयात रूजू झाले,1994 साली माझ्या दोन्ही किडण्या निकाम्या झाल्यावर माझ्या जन्मदात्या आईने मला किडणी दान केली,जे जे रूग्णालयात अधिष्ठाता म्हणून अविरत सेवा चालू आहे,एकेकाळी 13 व्या क्रमांकावर असणारे जेजे रूग्णालय आज देशातल्या पहील्या पाच रूग्णालयात गणले जाते, या वैद्यकीय प्रवासात पद्मश्रीसह अनेक पुरस्काराने गौरविलो गेलो…!

आकडे 90 लाख: मी आणि माझे सहकारी यांनी मिळून आजवर तपासलेले नेत्ररुग्ण.

दोन लाख पन्नास हजार मी आणि माझे सहकारी यांनी मिळून आजवर केलल्या यशस्वी नेत्रशस्त्रकि‘या.

1 लाख 41 हजार ऐवढ्या मी स्वतः एकट्याने आजवर केलल्या यशस्वी नेत्रशस्त्रकिया.

202 आरोग्य शिबीरातून तब्बल 81 हजार नेञशस्ञक्रिया चे यशस्वी नियोजन….!

माझा हा आरोग्यसेवेचा वसा सदैव चालू आहे आणि तो राहील…!