Articles Health More

एक पैसा देखील खर्च न करता पळून लावा झुरळ

cockroach on the wooden floor

झुरळ आणि घर आणि त्यातली त्यात स्वयंपाक घर हे ठरलेले समीकरण आहे. आपण त्याच्यामुळे प्रचंड त्रस्त होतो. त्यासाठी अनेक उपाय देखील करतो. हजारो -रुपये पेस्ट कंट्रोल ,फवारे यासाठी खर्च करतो ,पण झुरळ मात्र आपले घर काही सोडत नाही. झुरळामुळे अनेक समस्या उद्धभवतात.झुरळे काहीही खाऊन जिवंत राहू शकतात.

आपण खात असलेल्या साध्या अन्नापासून ते मृत वनस्पती, प्राणी व अगदी साबण, गम, पेपर, गळलेले केस यांवर देखील झुरळे जगू शकतात. रात्री फिरताना ते उघड्या अन्नावर मृत त्वचा, केस व अंड्याची कवचे टाकून त्यांना प्रदूषित करतात.झुरळांमुळे अनेक बॅक्टेरिया अन्नात मिसळून विषबाधा किंवा टायफाईडचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. विषबाधेच्या साथीमध्ये असे आढळून आले आहे की, जर झुरळांचा प्रादुर्भाव कमी झाला तर विषबाधेची समस्यादेखील आटोक्यात येण्यात मदत होते.

 झुरळ आपल्याला अतिशय किळसवाणे वाटते. त्यामुळे ते कोठेही फिरून जरी गेले तरी आपल्या मनात अनेक प्रश्न येतात.  जवळपास सर्वच घरात झुरळ असतात. स्वयंपाक , घरात तर इतके  झुरळ असतात की नावच नको वाटते. पण असा एक जालीम उपाय आहे काहीही पैसे न खर्च न करता घालवा झुरळ. यासाठी काही उपाय पुढील प्रमाणे.

लवंग हा मसाल्यातील अत्यंत म्हत्वचा पदार्थ आहे. लवंग चवीला तिखट असते. जर तुम्हाला घरात झुरळ दिसले तर लगेच त्याच्या समोर लवंग ठेवा. लवंगच्या वासाने झुरळ निघून जातील. काकडीचा वापर आपण सॅलड बनविण्यासाठी करतो ,पण काकडी देखील झुरळ घालविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तमालपत्र देखील तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही रोज घरात तमालपत्र  जाळले तर त्याच्या धूराने झुरळ कमी होतील.

रॉकेल देखील तुम्ही झुरळ पळवून लावण्यासाठी वापरू शकता. जर घरात खूपच झुरळ असतील तर महिन्यातून एकदा किचनच्या कोपऱ्यात रॉकेल शिंपडत जा. पण हे सर्व करताना काळजी घेणे जरूरी आहे. लसूण देखील तुम्ही वापरू शकता . त्याच्या वासाने झुरळ कमी होतात. बोरीक पाऊडर आणि साखर एकत्र करून ठेवा ,झुरळ बरेच कमी होतील.

रात्री स्वयंपाकघर आवरताना जमिनीवर किंवा स्वयंपाकाच्या ओटय़ावर आणि गॅसच्या शेगडीवर कोणतेही खाद्यपदार्थ सांडू देऊ नयेत. विशेषत: कणिक, मैदा, रवा यासारखे पदार्थ, शेगडीवर उतू जाऊन वाळलेले दूध, आमटी, कढी यासारखे पदार्थ झुरळांना पर्वणी असते. त्यामुळे रोजच्या रोज साबणाच्या पाण्याने ओटा, शेगडी व स्वयंपाकघरातील फरशी स्वछ पुसून काढावी व ती संपूर्णपणे कोरडी करावी. कारण पाण्याचा थोडा जरी अंश राहिला तर झुरळे खूश होतात व त्यांचा दिनक्रम चालू होतो! झुरळे आली नाहीत तर पालींचीसंख्यादेखील कमी होईल, हे साधे गणित आहे.