विद्या बालनविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत का? बॉयफ्रेंडने ‘या’ कारणामुळे केले होते ब्रेकअप

विद्या बालनविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत का? बॉयफ्रेंडने ‘या’ कारणामुळे केले होते ब्रेकअप

‘द डर्टी पिच्चर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री विद्या बालन आपल्या हटके अभियनयशैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक विषयांवर रोकठोक मत मांडल्यामुळे ती बऱ्याचदा माध्यमांच्या चर्चेचा विषय असते. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण विद्याविषयी खास माहिती जाणून घेणार आहोत.

विद्या मूळची केरळ येथील असून तिचा जन्म मात्र मुंबई येथे झाला आहे. असे असले तरी विद्या तिचे बंगालशी काहीतरी खास नाते आहे असे नेहमी सांगते. त्याचप्रमाणे ती बंगाली भाषादेखील अस्खलितपने बोलते. तिचे हे बंगाल कनेक्शन कशामुळे आहे याचा मात्र अद्यापपर्यंत खुलासा झालेला नाही.

वजन जास्त असल्यामुळे विद्याला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात तिला वजनामुळे अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले तर अनेक संधीदेखील नाकारल्या गेल्या. एवढंच नव्हे तर विद्याच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्याशी वजन जास्त असल्याच्या कारणाने ब्रेकअप केल्याचेही विद्याने सांगितले होते.

‘द डर्टी पिच्चर’ या चित्रपटातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनयामुळे विद्या प्रकाशझोतात आली. या चित्रपटासाठी विद्याने जवळपास 12 किलो वजन वाढवले होते. या चित्रपटात तिने साकारलेली सिल्क स्मिता ही भूमिका अत्यंत गाजली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विद्याने चित्रपट निर्माता आणि वितरक सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले आहे. विद्याची सासू सलोमी राय या माजी मिस इंडिया राहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणि ही विद्याची चुलत बहीण आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. विद्याला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.