Articles Featured Inspirational Uncategorized

घरात चुकूनही ठेवू नका या वस्तू किंवा फोटो अन्यथा दारिद्य सोडणार नाही तुमचा पिच्छा

वास्तुशास्त्राला भारतात फार महत्व आहे. हिंदू धर्माच्या अनुसार भगवान ब्रह्मा यांनी हे वास्तूशास्त्राचे नियम बनवले होते. घरातील वस्तू या परिवाराच्या सुख आणि सुखासाठी कारणीभूत ठरत असतात. जर तुम्ही घरातील सर्व वस्तू या वास्तूशास्त्राच्या नियमानुसार ठेवल्या तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. मात्र जर तुमच्या घराच्या वास्तूमध्ये दोष असेल तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात राहते. यामुळे तुमच्या घरात गरिबी, अशांती आणि दुर्भाग्य घेऊन येते. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

जंगली जनावरांचे फोटो घरात नको

आपल्याला अनेकांना घरात चांगले फोटो लावण्याची आवड असते. यामुळे खोलीची शोभा आणखीन वाढते. मात्र अनेकदा आपण सुंदरतेचा विचार करून घरात असे फोटोदेखील आणतो जे फोटो आपल्या वास्तुदोषाला कारणीभूत ठरतील. त्यांपैकीच एक म्हणजे जंगली जनावरांचे फोटो. पौराणिक ग्रंथांच्या अनुसार,गिधाड, घुबड, कबुतर, कावळा, घार आणि बगळ्यांसारख्या पक्षांचे फोटो घरात लावू नयेत. जर तुम्ही घरात हे फोटो लावले तर तुमच्या घरात कायम नकारात्मक ऊर्जा राहील. त्याचबरोबर घरात अडचणी देखील निर्माण होतील. घरातील सदस्य आजारी पडतील किंवा तुमचा विकास खंडित होईल. घरात कायम अशांती राहील, गरिबी वाढण्यास देखील हे फोटो कारणीभूत ठरतील आणि दुर्भाग्य तुमचा पिच्छा सोडणार नाही.

त्याचबरोबर वास्तू शास्त्राच्या मते जीव जंतू जसे कि, साप आणि अजगरासारख्या प्राण्यांचे फोटो देखील घरामध्ये लावू नयेत. अनेकदा आपण आकर्षित होऊन असे फोटो घरामध्ये लावत असतो, मात्र हे फोटो आपल्याला नेहमी नकारात्मक ऊर्जा देतात. या फोटोना घरात लावल्याने घरात नेहमी भांडणे होतात. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या जंगली प्राण्यांचे आणि पक्षांचे देखील फोटो घरामध्ये लावू नयेत.

पैसे आणि सुख मिळवण्यासाठी घरात ठेवा शंख

जर तुम्हाला तुमच्या घरात कायम सुख आणि शांती राहावी असे वाटत आले तर तुम्ही घरात शंख ठेवण्यास सुरुवात करा. त्याचबरोबर घरात पैसे राहावे यासाठी देखील शंख घरात कायमस्वरूपी ठेवावं. पूजा पाठ मध्ये देखील शंखाला फार महत्व आहे. आपल्या घरातील देव्हाऱ्यामध्ये देखील कायम शंख ठेवावा. शंखातील ध्वनी हे चमत्कारी असतात असे शास्त्रात लिहिले आहे. या आवाजामुळे केवळ घरातील नकारात्मक ऊर्जाच नष्ट होत नाही तर अनेक आजारांपासून देखील आपले सरंक्षण होते. अनेकांना असा विश्वास आहे कि, शंख वाजवल्याने हृदयाचे आजार देखील नष्ट होतात.

त्याचबरोबर फेंगशुईमध्ये देखील शंखनाद आणि शंकांचे फायदे सांगितले आहेत. ज्या घरात रोज शंख वाजतो त्या घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहते. त्याचबरोबर धनलक्ष्मी देवीचा देखील त्या घरामध्ये वास राहतो. शंख छोटा असो किंवा मोठा याने काहीही फरक पडत नाही. त्याचबरोबर तुमच्या दुकानात किंवा व्यवसायात ठेवल्याने देखील याचा मोठा फायदा होतो.