Articles

पहिल्यांदा विमान प्रवास करताय मंग हे नक्की वाचा

मनमुराद भटकंती करणे, प्रवासाचा आस्वाद घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रवास करण्यासाठी अगदी पुरातन काळापासून निरनिराळी प्रवासी वाहने, दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत .या दळणवळणाच्या साधनांमध्ये ही आर्थिक स्तर व बसण्यासाठी, वावरण्यासाठी सेवा-सुविधा यांच्यानुसार वर्ग किंवा क्लास केलेले असतात .फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास, इकॉनोमिक क्लास ,प्राईम क्लास अशी निरनिराळ्या क्लास बद्दल आपण ऐकत असतो .विमान प्रवास करत असतानासुद्धा इकॉनोमिक क्लास , फर्स्ट क्लास इत्यादी नुसार बसण्याची तिकीट व्यवस्था केलेली असते .आज आपण जाणून घेणार आहोत विमान सेवेतील क्लास बद्दल.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील प्रवासी वर्ग हा मुख्यतः त्या वाहन व्यवस्थेमधील बसण्याच्या दर्जा किंवा प्रकारानुसार ठरवला जातो. वाहन व्यवस्थेमध्ये बसण्याची सीट किंवा केबिन मधील उपलब्ध जागे नुसार क्लास ठरवला जातो. बिझनेस क्लास मध्ये बसण्याची जागाही जास्त आरामदायी असते त्यामुळे त्याचे तिकीटही जास्त महाग असते.

खूप पूर्वीपासून विमानाचे क्लास हे फर्स्ट क्लास बिझनेस क्लास व इकॉनोमिक क्लास अशाप्रकारे वर्गवारी करण्यात आलेली आहे .सध्याच्या काळात काही एअरलाइन विमानसेवांनी बिझनेस क्लास इकॉनोमिक क्लास यांच्यामध्ये प्राईम क्लास व्यवस्था सुरू केली आहे .वेगवेगळ्या क्लास मधील सुविधांमध्ये सुद्धा फरक असतो.

इकॉनोमिक क्लास: इकॉनोमिक क्लासचे तिकिट हे सर्वात कमी किमतीचे असते व इकॉनॉमी क्लासमध्ये प्राईम इकॉनोमी क्लास, बिझनेस क्लास व फर्स्ट क्लास यांच्या तुलनेत सर्वात कमी सेवा असतात. इकॉनोमी क्लास मध्ये सीटच्या समोर व्हिडीओ बघण्यासाठी छोटी स्क्रीन असते व त्याचबरोबर वाचनासाठी मासिके, खानपान साठी काही सीमित अल्पोपहार रही पुरवला जातो.

प्राईम इकॉनोमिक क्लासः प्राईम इकॉनोमिक क्लास मध्ये प्रवास करताना सीट मधील बसण्यासाठी ची जागा काही प्रमाणात जास्त असते त्यामुळे सुविधाजनक प्रवास होऊ शकतो त्याच बरोबर खाण्यापिण्याच्या सेवा या अधिक प्रमाणात उपलब्ध असतात.

बिझनेस क्लासः बिझनेस क्लास ही संज्ञा या क्लास मधून मोठ्या प्रमाणात बिझनेस मॅन व सेलिब्रिटीज प्रवास करत असल्यामुळे रुढ झाली आहे.बिझनेस क्लास मधून प्रवास करण्यासाठी चे तिकीट हे इकॉनॉमी क्लास आणि प्राईम इकॉनॉमी क्लास अपेक्षा निश्चितच तुलनेने खूप जास्त असते मात्र त्यामध्ये पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधाही तितक्याच प्रमाणात जास्तही असतात. बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळा चेक-इन एरिया असतो व त्यांना विमानतळावर वेगळे बिझनेस क्लास लाउंजहीउपलब्ध करून दिले जातात. लाउंज मध्ये इंटरनेट, वाय-फाय ,मनोरंजनाची साधने व खाण्यापिण्याच्या निरनिराळे काउंटर उपलब्ध असतात .बिझनेस क्लासचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बिझनेस क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वात प्रथम विमानातून उतरण्याची परवानगी दिली जाते व कस्टमर लाईनलाही सर्वात आधी बिझनेस क्लासचे प्रवासी उभे राहू शकतात.

फर्स्ट क्लास ःफर्स्टक्लास हा विमान व्यवस्थेतील सर्वात जास्त आरामदायी व सर्वात जास्त महागडा क्लास असतो. फर्स्ट क्लास ची इकॉनोमी क्लास व अन्य क्लासच्या तुलनेत असलेली वैशिष्ट्य म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये इंटरनेटची सुविधा ,मोठा टीव्ही ,स्वतंत्र वॉशरूम ,झोपण्यासाठी बेड व पर्सनल सूट आणि कपल सूट अशी दोन वेगवेगळी वर्गवारी असलेल्या सुविधा असतात. कोणत्याही विमानात फर्स्टक्लास हा विमानाच्या अगदी पुढच्या भागात असतो .याठिकाणी वावरण्यासाठी सर्वात जास्त जागा असते. फर्स्ट क्लास मधून प्रवास करत असतानाचा खान पानाचा मेनू हा इकॉनॉमी क्लास आणि बिझनेस क्लास पेक्षा वेगळा असतो. फर्स्टक्लास मध्ये बनवलेले मेनू फाइव्ह स्टार शेफकडून बनवून घेतलेला असतो. फर्स्ट क्लास मधून प्रवास करण्यासाठीचे विमान तिकीट हे इकॉनोमी क्लासच्या तिकीट मूल्यापेक्षा जवळपास सहा पटीने जास्त असते. फर्स्ट क्लास मध्ये सिंगल सूट आणि कपल सुट या दोन निरनिराळ्या वर्गांचे सुद्धा कॅबिन पासूनच्या अंतरामध्ये फरक असतो व या दोन वर्गांच्या तिकीटांच्या मुल्यांमध्ये यांमध्येही फरक असतो.

सिंगापूर एअरलाइन्स कडून पुरवल्या जाणाऱ्या फर्स्टक्लास मधील कपल सूटमध्ये स्वतंत्र बार आणि स्पाची सुद्धा सुविधा उपलब्ध केली जाते .या व्यतिरिक्त मनोरंजनाची सुद्धा काही साधने उपलब्ध करून दिली जातात.