अभिमानास्पद…! हॉटेलच्या छोट्या भिंतीवर बसून गरीब रुग्णांवर करतात उपचार, फी बघून चकित व्हाल


सोशल माध्यमांवर एखादी गोष्ट व्हायरल होते ,तेव्हा त्या गोष्टींच्या सत्यतेची पडताळणी केली जाते. फोटो असेल तर त्यामागील खरी गोष्ट काय आहे. याचा शोध घेतला जातो. सध्या सोशल माध्यमांवर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकजण फार व्यतीत झाले आहेत. खालील फोटोमध्ये एक सामान्य माणूस साधे कपडे घालून एका तीन रुपयांच्या पेनने कागदांच्या तुकड्यावर काहीतरी लिहीत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर थोडासा नॉर्मलच वाटेल ,पण जेव्हा या फोटोमागील खरी गोष्ट समोर येते ,तेव्हा मात्र आपलं मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहतं नाही.

तर ही आहे या फोटोमागील सत्य परिस्थिती ,जो साध्या कपड्यातील माणूस आहे ,जो एका कागदावर अगदी साध्या पेनने काही लिहीत आहे ,तो व्यक्ती दुसरा -तिसरा कोणी नसून कर्नाटक जिल्ह्यातील  केमडुआ जिल्हयातील डॉक्टर  शंकर गौड़ा एमबीबीएस एमडी    हे आहेत. त्यांच्याकडे साधा दवाखाना चालू करतील इतके पैसे देखील त्यांच्याकडे नाहीत. शंकर या विषयी सांगतात ,की एक छोटी खोली घेऊन जरी दवाखाना सुरु करायचा असेल तर ३-४ लाख भांडवल लागते.

जे त्यांच्याकडे नाहीत. शहरांपासून अगदी काही अंतरावर त्यांचे गाव आहे. तेथे त्यांच्या दोन खोल्या आहेत. ते तेथेच राहतात. त्यांच्या मते त्यांचे रुग्ण त्या गावात कसे येतील म्हणून ते स्वताच रोज सकाळी आठ वाजता शहरात येतात व  एका फास्ट फूड विकणाऱ्या हॉटेलच्या छोट्या भिंतीवर बसून गरीब रुग्णांवर उपचार करतात.

एका साध्य कागदांवर ते रुग्णांना परवडतील अशी जेनेरिक औषधे लिहून देतात. ज्यामुळे गरीब रुग्णांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. रोज जवळपास १०० हुन अधिक रुग्णांवर ते उपचार करतात. सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे ते फक्त ५ रुपये फी घेतात. तुम्ही विचार कराल  एमबीबीएस एमडी डॉक्टर फक्त पाच रुपये फी हे कसं शक्य आहे. तर हे खरं आहे. त्यांचे हे कार्य खरंच सेवाभावना दर्शविते. नमन आहे अशा डॉक्टरांना.