देशातील पहिली खाजगी रेल्वे तेजस या गाडीचे मालक कोण आहेत ?

भारतीय रेल्वे जगभरात प्रसिद्ध आहे.   जगातील सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे रेल्वे आहे. परंतु आताच्या सरकाने रेल्वेमध्ये खाजगीकरण करण्यास सुरवात केली आहे. यांचेच पहिले उदारण म्हणजे तेजस एक्सप्रेस. देशातील पहिली खाजगी ‘तेजस एक्स्प्रेस’ ट्रेन 4 ऑक्टोबरपासून धावली  आहे.

ही ट्रेन भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) द्वारे संचलित केली जात आहे. म्हणजेच काय तर या ट्रेनचे संचलन पूर्णपणे आयआरसीटीसीच्या हातात असेल. या ट्रेनमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील आणि पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीद्वारे ही ट्रेन चालवली जात आहे. म्हणजेच काय तर ही गाडी भारतीय रेल्वेच्या मालकीची आहे परंतु ती चालवण्यासाठी  एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. ही गाडी आपल्या सरकारी रूळांवरूच धावते.

या रेल्वेला लोको पायलट व गार्ड देखील आहेत. या गाडीचे कंट्रोलिंग हे सरकारच्या हातात आहे.  जसे की स्टेशन मास्तर इत्यादी यांचे यावर लक्ष आहे. ही गाडी आपल्याच सरकारी स्टेशन थांबते. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख रुपये खर्चतेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली ट्रेन आहे की ज्या ट्रेनला स्वयंचलित प्लगसारखे दरवाजे लावण्यात आले आहेत. म्हणजेच मेट्रोसारखे या ट्रेनचे दरवाजे आपोआप उघडतील व बंद होतील.तेजस नाव असल्याने रेल्वेच्या डब्याला सूर्यकिरणाचा रंग देण्यात आला आहे.