Articles

कुत्रे मूत्रविसर्जन करताना एक पाय वर का उचलतात? हे आहे कारण.

कुत्रे मूत्रविसर्जन करताना एक पाय वर का उचलतात? हे आहे कारण.

कुत्रा हा एकदम इमानदार प्राणी समजला जातो. कुत्रा आणि माणसाचे नाते अतूट आहे. पाळीव कुत्रे बऱ्यापैकी माणसाळलेले असतात. पाळीव कुत्रा आपल्या मालकाच्या बऱ्याच सवयींशी परिचित असतो. अगदी त्याचप्रमाणे काही प्रमाणात कुत्र्याचा मालकही कुत्र्याच्या सवयीशी परिचित असतो. मात्र कुत्र्यांच्या काही सवयींशी किंवा स्वभाववैशिष्ट्यांशी माणूस परिचित नसतो.

यापैकी एक गोष्ट म्हणजे कुत्रे मूत्रविसर्जन करताना एक पाय वर करून का मूत्र विसर्जन करतात. याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. यातील तज्ज्ञांची मतेही वेगळे असू शकतात. मात्र कुत्रे असं का करतात याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. त्यातीलच काही कारणं आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

स्वच्छता : कुत्र्यांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते. अगदी त्यांना बसायचे असेल तरीसुद्धा ते पायाने आधी माती उकरतात आणि मगच त्यावर बसतात. कुत्र्याच्या शरीराची रचना अशी असते कि त्याने जर पाय वर करून मूत्रविसर्जन केले नाही तर त्याच्या पायांवर ते मूत्र पडेल. कुत्र्याला स्वच्छता प्रिय असल्यामुळे कुत्रे असं न करता एक पाय वर करून भिंत किंवा खांबावर मूत्रविसर्जन करतात.

गंध : कुत्रे त्यांच्या इलाख्यात अशा प्रकारे मूत्रविसर्जन करून, एकप्रकारे लँडमार्क करत असतात. जेणेकरून त्यांच्या साथीदारांना कुत्रे कुठे गेले आहे याची दिशा मिळेल. त्या मुत्राच्या गंधाच्या दिशेने इतर कुत्रे मूत्रविसर्जन केलेल्या कुत्र्याला शोधून काढतात.

याच अनुषंगाने प्रजननाच्या मौसमात कुत्र्यांना आपला जोडीदार शोधनेदेखील सोपे जाते. तसेच इतर इलाक्यातील कुत्रा दुसऱ्या हलक्यात गेलास कुत्र्यांना एकमेकांच्या मुत्राच्या गंधावरून ते समजते. त्यामुळे नवीन कुत्रा आपल्याला हानिकारक आहे कि नाही हे त्या इलाक्यातील कुत्रे मुत्राच्या गंधावरून ठरवतात.

About the author

Being Maharashtrian