…म्हणून कोलकत्ता पोलीस घालत नाही खाकी वर्दी…जाणून घ्या रहस्यमय कारण

0
1195

Loading...

खाकी वर्दीचे नाव घेतले की आठवतात निःस्वार्थ सेवा करणारे सुट्टी न घेता 24-24 तास काम करणारे, उन्हाळा,पावसाळा,हिवाळा कधीही लोकांच्या मदतीला धावून येणारे,वेळे प्रसंगी आपला जीव धोख्यात घालणारे पोलीस बांधव.

Loading...

Loading...

काही लोक याला अपवाद असतीलही,पण पोलीस च आहेत ज्या मुळे आपण दैनिक,दैनंदिन,न घाबरता कामे करू शकतो. खाकी वर्दी म्हणजे भारताची आन,बाण आणि शान असे म्हंटले तरी हरकत नाही.

Loading...

पण तुम्हाला माहीत आहे का ज्या वर्दी मुळे पोलीसांना ओळख मिळते त्या वर्दी चा रंग खाकीच का आहे?इतर दुसरा कोणता का नाही. तसेच पश्चिम बंगाल मधील पोलीस वर्दी चा रंग पांढरा व इतर संपूर्ण देशात खाकी का आहे.

जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होत तेव्हा संपूर्ण पोलिसांच्या खाकी चा रंग पांढरा होता.मात्र पांढऱ्या रंगाचा गणवेश असल्यामुळे दिवसभर कामे केल्याने रात्री कपड्यांची वाट लागायची.कपडे धुळीने आणि घाणीने भरून जायचे.पोलीस कर्मचारी सुद्धा या प्रकाराला कंटाळले होते.

जी वर्दी त्यांना ओळख द्यायची तीच अशी घाण होणं म्हणजेज एक त्यांच्यासाठी व अनुशासनासाठी अपमानास्पद होत.त्यावर पर्यायी उपाय म्हणून पोलीस वर्दीला विविध रंग देऊ लागले.

कोणी पांढऱ्या वर्दीला निळ मध्ये धुऊन तिचा रंग निळसर करत असे,तर कोणाचे कपडे घाण होऊन आपोआप घाण होऊन पिवळे पडत असत. या मुळे एकाच प्रकारच्या पोलिसांची विविध रंगाची वर्दी दिसे.हीच समस्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही असायची.म्हणून त्यांनी एक खाकी रंगाचा डाय बनवून घेतला.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गर्दीवर ज्यास्त डाग दिसत नव्हते.

वरिष्ठ पोलिसांचे अनुकरण करून पोलीस कर्मचारीही वर्दी साठी चहा पावडर वापरू लागले.हळूहळू सर्वांचीच वर्दी पांढरी ची खाकी होऊ लागली. खाकी हा असा रंग होता ज्यावर उन्हात किव्हा पावसात कोणताही परिणाम होत नसे.आणि तो ज्यास्त मळत ही नसे.

म्हणून शेवटी 1847 मध्ये सर हेरी लंबष्टेन यांनी अधिकृत पण खाकी वर्दीची पोलिसांसाठी निवड केली.सर हेरी लंबष्टेन यांनी खाकी रंगच का निवडला या मागे ही काही कारण आहेत.त्याकाळात ते गवरणर agint होते.त्यांनी सन 1846 मध्ये कॉप्स ऑफ कॉस्ट नावाच्या फोर्स रचना केली.

ही फोर्स एक भारतीय सेनेची तुकडी होती.जी उत्तरी पश्चिमी सीमे साठी बनवली होती.त्या तुकडी साठी 1847 मध्ये सर हेरी लंबष्टेन यांनी खाकी वर्दी निश्चित केली.तेव्हापासून भारतात पोलीस खाकी वर्दीने ओळखले जातात.भारतात जरी सर्वत्र खाकी वर्दी असली तरी कोलकात्यात अजूनही पोलिसांना पांढरीच वर्दी आहे.

1845 मध्ये इंग्रजांनी कोलकात्यात पोलीस दल चालू केले ठेव्हा वर्दी ही पांढरीचा होती.1847 मध्ये सर हेरी लंबष्टेन यांनी खाकी वर्दीचे प्रस्ताव कोलकाता पोलिसांच्या समोर ठेवला होता.मात्र त्यांनी तो खारीज केला.कारण कोलकाता येते वातावरण दमट असल्यामुळे गर्मी पासून संवरक्षण करण्यासाठी scientist नुसार त्यांना पांढरी वर्दीच योग्य आहे असा निष्कर्ष काढण्यात आला.

पुढे 1864 मध्ये पश्चिम बंगाल पोलिसांची तुकडी उभी करण्यात आली व संपूर्ण राज्यातील पोलिसांना पांढऱ्या रंगाची वर्दी देण्यात आली.या मागचे मुख्य कारण हेच होते की खाकी वर्दी पेक्ष्या पांढऱ्या रंगाच्या वर्दी मुळे गर्मी पासून रक्षण होते.

म्हणून देशभरातील पोलीस खाकी व कोलकाता व पश्चिम बंगाल येतील पोलीस पांढऱ्या रंगात पाहायला मिळतात.तोच नियम आजपर्यंत टिकून आहे.इंग्रज भारत सोडून गेले पण हे दोन रंग सोडून गेले.

Loading...