Articles

…म्हणून वकील काळा कोट आणि गळ्यात बॅंड घालतात. जाणून घ्या

…म्हणून वकील काळा कोट आणि गळ्यात बॅंड घालतात. जाणून घ्या

वकील म्हंटल की काळा कोट आणि गाऊन हे समीकरण आलंच. एखादी व्यक्ती पांढरा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा कोट घातलेली आणि गळ्यात बॅंड घातलेली दिसली की ती व्यक्ती हमखास वकील असल्याचा आपला समज होतो.

न्यायालयात अथवा न्यायालयाच्या आवारात अशी काळ्या कोटातली व्यक्ती लगेच लक्षात येते. कारण ती व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी आणि वकिली पेशा असलेली व्यक्ती असते. परंतु वकील काळा कोट का घालतात? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. यामागे कारणही भन्नाट आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत आजच्या ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या लेखामध्ये.

वकील किंवा न्यायाधीशांच्या काळा कोट आणि पोशाखांबद्ल अनेक तर्क लावले जातात. भारतीय न्यायालयांमध्ये न्यायाधीश काळ्या रंगाचा गाऊन घालतात, तर वकील काळ्या रंगाचा कोट घालतात. वकील कायदा १९६१ (Advocate Act १९६१) मध्ये वकिलांच्या पोषाखाविषयी स्पष्ट तरतुदी दिल्या आहेत.

वकील कायदा १९६१ नुसार न्यायालयात न्यायालयीन प्रक्रिया सुरु असतांना वकिलांनी काळा कोट आणि गळ्याभोवती बॅंड घालणे आवश्यक आहे, तर न्यायाधीशांनी काळ्या रंगाचा गाऊन घालण्यासंबंधी निर्देश दिलेले आहे. या प्रथेचा उदय इंग्लंड येथे झाला. सर्वात आधी इंग्लंडच्या वकिलांनी काळ्या रंगाचा कोट घातला. १६८५ साली दुसरा किम चार्ल्सचं निधन झालं. तेव्हा त्यांच्याविषयी शोक प्रकट करण्यासाठी सर्व वकिलांना काळा कोट घालण्यासंबंधी निर्देश देण्यात आहे.

भारतीय न्यायपालिका आजही काही प्रमाणात इंग्रज काळातील कायद्यांचा अवलंब करते असे कायम बोलले जाते. त्यामुळे वकिलांनी काळा कोट घालण्याची ही प्रथाही ब्रिटीश काळापासून चालत आलेली आहे. याशिवाय काळा कोट हा अंधत्वाच प्रतिक आहे. परिणामी न्यायाधीश आणि वकील कधीच त्यांच्या कर्तव्यात कधीच पक्षपाती पणा करत नाहीत.

न्यायाधीश हे न्यायाप्रती प्रामाणिक असतात तर वकील हे सत्य बाजू मांडण्याच्या दृष्टीने प्रामाणिक असतात.
वकील काळा कोट घालून निप:क्षपाती न्यायासाठी प्रामाणिक आचरण करतात. काळा रंग शक्ती आणि शौर्याचं प्रतीकही मानलं जातं, त्यामुळे देखील वकील काळा कोट परिधान कारतात असे म्हटले जाते.