Articles

आकाशातून वीज का पडते? वीजेपासून बचाव कसा करावा? जाणून घ्या सविस्तर

विजेचा कडकडाट होणे किंवा वीज कडाडणे हे शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकले आहेत. पावसाळ्याच्या हंगामामध्ये आकाशात पावसाचे ढग जमा झाले की वीजांचा कडकडाट झाल्याचे आढळून येते. काहीवेळा अन्य ऋतुंमध्ये सुद्वा आकाशात आपल्याला वीज चमकताना दिसते. कडाडणार्‍या विजा या जमिनीवर आल्यानंतर मनुष्य आणि वित्त दोन्हींनाही हानिकारक असतात. मात्र मुळात वीजांची निर्मिती कशी होते हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल. आज आपण आकाशामध्ये वीजे ची निर्मिती कशी होते हे पाहणार आहोत.

आकाशात वीजांची निर्मिती का होते?

जमिनीवरुन उष्ण हवा प्रचंड वेगाने वरती आकाशात जाते व वरती थंड होऊन तिचे रूपांतर ढगांमध्ये होते .पृथ्वीवरून भूपृष्ठावरून  प्रचंड वेगाने प्रसारित होणाऱ्या उष्ण हवेचे वातावरणातील उंच स्तरावर गेल्यानंतर थंड होण्यामुळे ढगांमध्ये पाणी किंवा बर्फाचे कण निर्माण होतात व  ते पाणी आणि बर्फाचे कण पावसाच्या स्वरूपात खाली येतात.

आकाशात निर्माण होणारी वीज ढगाच्या अंतर्गत होणाऱ्या विद्युत घर्षण हालचालींमुळे किंवा दोन भिन्न ढगांच्या मधील विद्युत घर्षणामुळे निर्माण होते. आकाशामधील ढग आणि जमिनीमध्ये निर्माण होणारे विद्युत घर्षणामुळे सुद्धा विजेची निर्मिती होऊ शकते. ढगांमध्ये पाणी आणि बर्फाचे कण एकमेकांभोवती वेगाने फिरत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये घर्षण प्रक्रिया घडून ते वेगवेगळे होतात व त्यांच्यामध्ये विरुद्ध विद्युत ऊर्जा निर्माण होते.

ढगांच्या आत मध्ये निर्माण झालेला प्लस विद्युत प्रवाह हा ढगांच्या वरच्या थरावर प्रवाहित होतो. तर मायनस विद्युत प्रवाह ढगांच्या तळाच्या थरामध्ये असतो. ढगांच्या तळाच्या थरात असलेल्या मायनस विद्युत प्रवाह मधील बर्फ आणि पाण्याचे कण आकाराने मोठे मोठे होत जातात व भूपृष्ठावर असलेल्या प्लस विद्युत प्रवाहाकडे ते आकृष्ट होऊ लागतात व यातूनच विजेची निर्मिती होते. विजेची निर्मिती होत असताना ढगांच्या मधील विद्युत प्रवाह हा जमिनीकडे आकृष्ट होतो.

 आकाशामध्ये विज  काही सेकंद चमकत असते मात्र तिच्यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे वहन होत असल्यामुळे वीज खूप उष्ण असते. काहीवेळा विजेचे तापमान हे सूर्याच्या उष्णतेपेक्षा सुद्धा अधिक असते. वीजे मधील या ऊष्णतेमुळे विजांच्या कडकडाटाचा आवाज निर्माण होतो. विजेमधील उष्णता हवेला सुद्धा उष्ण बनवते व वातावरणातील हवा यामुळे प्रसरण पावते .या प्रसरणाच्या प्रक्रियेतूनच विजांच्या कडकडाटाचा आवाज निर्माण होतो.

आकाशात निर्माण होणारी वीज  मनुष्यहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात घडवून आणते कारण आकाशातून जमिनीवर येताना प्रवाहित होण्यासाठी एखाद्या वाहकाचे माध्यम म्हणून वीज वापर करते. अशावेळी विजेच्या खांबांवर वीज पडून त्यामधून ती प्रवाहित होते किंवा एखादा मनुष्य किंवा सजीव प्राणी या विजेच्या संपर्कात आला तर त्याच्या मधूनही ती प्रवाहित होऊ शकते.

विजेपासून बचाव करण्यासाठी काही खबरदारीचे उपाय

आकाशात निर्माण होणाऱ्या विजेपासून बचाव करण्यासाठी काही खबरदारीचे उपाय घेणे आवश्यक असते. शक्‍यतो विजांचा कडकडाट सुरू असताना घराच्या बाहेर जाणे टाळावे. झाडांखाली किंवा मोकळ्या मैदानामध्ये उभे राहू नये. अशावेळी वीज अंगावर पडण्याचा धोका असतो. वीज प्रवाह करू शकणार्‍या रेडिएटर, विजेचे खांब इत्यादीसारख्या उपकरणापासून दूर रहावे.

 विजा कडाडत असताना एखाद्या इमारतीमध्ये राहणे हे सर्वात जास्त सुरक्षित मानले जाते. विजा कडाडत असताना शक्यतो मोबाईल फोनचा वापर करू नये कारण याद्वारे विजेचे वहन खूप वेगाने होते.विजा कडाडत असताना जर आपण पोहत असाल तर लागलीच पाण्याच्या बाहेर येणे आवश्यक असते. आकाशात वीजा चमकत असताना टेलिव्हिजन, एसी,व.अन्य तत्सम विद्युत उपकरणे बंंद ठेवावीत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद . #beingmaharashtrian