संदीप महेश्वरी युट्यूब वरून पैसे का कमवत नाही ?

संदीप महेश्वरी हा एक मोटिवेशनल  स्पीकर आहे. मोटिवेशनल  स्पीकर म्हणजे जो तुम्हाला आत्मबल देतो. तुम्हाला  एक  प्रकारची उभारी देतो. अशा लोकांना मोटिवेशनल  स्पीकर म्हणतात. जीवनांत अनेक वेळा असे प्रसंग येतात ,जेव्हा आपण सर्व काही गमावलं आहे. सर्व मार्ग बंद झाले आहेत असे वाटते अशा वेळेस असे मोटिवेशनल  व्हिडीओ खूप उभारी देऊन जातात.

संदीप त्यापैकी एक आहे. संदीपच्या मोटिवेशनल व्हिडिओला करोडो हिट्स जातात. खास करून त्यांचा तरुणवर्ग मोठा चाहता  आहे. युट्युबवर जेव्हा तुमचे अनेक  सब्सक्राईबर्स ,फॉलोवर्स होतात तेव्हा तुम्हाला तुमच्या युट्युब चॅनेलला जाहिराती मिळतात. या जाहिरातींच्या माध्यमातून  अनेकजण लाखो रुपये कमावतात. परंतु संदीप  महेश्वरी असा वक्ता आहे की जो त्यांचे लाखों व्हिवर्स असून देखील युट्युबच्या माध्यमातून एक रुपया देखील कमावत नाही.  

आज आपण या मागील कारण जाणून घेणार आहोत. संदीप याचे युट्युबवर १५  मिलियनहुन  अधिक फोल्लोर्स आहेत. तो त्यातून महिन्याकाठी १० लाख रुपयांहून अधिक पैसे कमावू शकतो. पण तो   कमावत नाही ,कारण त्यांच्या मते त्यांचे मोटिवेशनल स्पीकर आहेत ते जेव्हा बोलतात ऐकणारा एका वेगळ्याच विचारात असतो. जर मध्येच जाहिरात लागली तर त्यांचे जे विचारचक्र ते मध्येच थांबते.

जाहिरातीमुळे व्यत्यय येतो असे संदीप यांचे मत आहे. त्यामुळे संदीप युट्युबच्या माध्यमातून पैसे कमावत नाहीत. मला पैसे कमावणे महत्त्वाचे नसुन माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे आहे. मला जेवढं मिळालंय त्यात मी समाधानी आहे. दोन वेळच जेवण आणि गरजा पूर्ण होत असतील तर पैसा-पैसा करण्यात काही अर्थ नाही.

 हा माणूसच वेगळा आहे … 
एकदा एका सेमिनारच्या दरम्यान संदीप यांना एक मुलीने एक सल्ला दिला. जर तुम्ही युट्युबचे पैसे कमावून जर ते गरीब लोकांसाठी वापरले तर त्यामुळे कित्येक जणांचे भले होईल. त्या वेळेस संदीप यांनी खूप भन्नाट उत्तर दिले , पैशापेक्षा मी या माध्यमातून लोकांची अधिक मदत  करतो.