…म्हणून लोक थायलंड ला जातात, जाणून घ्या थायलंड मधील या रंजक गोष्टी

थायलंड मधील या रंजक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

थायलंड हा असा एक देश आहे,जेथे जगभरातून पर्यटक भेट देतात. अनेक पर्यटकांची पहिली परदेशवारी ही थायलंडलाच असते. थायलंडची राजधानी बँकॉक हे देखील खूप प्रसिद्ध शहर आहे. येथील सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासारखे आहेत. पटाया हे शहर तरुणांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आज आपण जाणून घेणार आहोत थायलंडमधील अशा काही  रंजक गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहित असतील. 

थायलंडला नेहमीच मौज -मजेच्या दृष्टीने  पाहिले जाते. तरुण युवकांना तर थाईलंडनला जाण्यासाठी फार उत्सुक असतात.

थायलंडमधील पटाया हे शहर रेड लाइट एरियासाठी प्रसिद्ध आहे. येथे सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. जगभरातून अनेक पर्यटक खास येथील नाइट लाईफ अनुभवण्यासाठी येतात. या व्यवसायातून येथील सरकारला देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. 

थायलंडमध्ये वेश्या व्यवसाय जरी अनधिकृत असला तरी  हा व्यवसाय येथे खुलेआम सुरुअसतो . येथे १ लाखांहून अधिक वेश्या आहेत. 

थायलंडमध्ये एक लाखांहून अधिक लोक या एरियास भेट देतात. पटाया या शहरातील २० % लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांना यातून आर्थिक उत्पन्न मिळते. पटायमधील नाना प्लाजा  आणि सॉय काउब्वॉय ह्या जागा रेड लाइट एरियासाठी प्रसिद्ध आहे. 

 या बरोबरच खालील  गोष्टीसाठी थायलंड प्रसिद्ध आहे.

संपूर्ण आशिया खंडात चीन नंतर सर्वात जास्त पर्यटकांनी भेट ही थायलंडला दिली आहे. थायलंड शब्दाचा अर्थ होते. संपूर्ण स्वातंत्र्य म्हणेजच मोकळीक असेलला देश होय. 

भारतीय लोक जगात सर्वात जास्त अंधश्रद्धाळू मानले जातात,पण तुम्हाला माहीत आहे का? थाई लोक भारतीय लोकांपेक्षा एक पाऊल जास्त अंधश्रद्धाळू आहे. थाई लोक भूत -प्रेत यावर देखील विश्वास करतात. येथील लोक भूत -प्रेत यांच्यापासून वाचण्यासाठी घरात एक वेगळी खोली बनवितात. 

थायलंडमध्ये राजा -राणी यांना देवाप्रमाणे मानले जाते. त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे त्यांच्या देशात जाऊन तुम्ही जर त्यांच्या राजा – राणीचा अपमान केला तर तुम्हाला ते फार महागात पडले असते. तुम्हाला अटक देखील होऊ शकते. 

थायलंडमध्ये  बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत,येथे जवळपास ९५ टक्के नागरिक हे बौद्ध धर्मीय आहेत.  जरी थायलंडमध्ये बौद्ध धर्म मानणाऱ्याची संख्या जरी मोठी असती तरी येथे  हिंदू धर्म मानणारे देखील भरपूर आहेत. 

थाईलंडचा  राष्ट्रीय धर्म ग्रंथ हा रामायण आहे. तेथील रामायण हे थाई भाषेत आहे. तेथीलच वर्णन केलेले आहे.  थायलंडचे  राष्ट्रीय चिन्ह हे गरुड हे आहे .

प्रत्येक देशांत शरीरांच्या विविध अवयवांना घेऊन अनेक मान्यता आहेत. थायलंडमध्ये देखील अशीच एक मान्यता आहे. थाई लोक माथ्याला म्हणजेच डोक्याला खूप पवित्र मानतात. येथे दुसऱ्याच्या माथ्याला हात लावणे फार चुकीचे मानले जाते. 

थायलंड हा असा दक्षिण -पूर्व आशियाई देश आहे ज्यावर युरोपीय देशांनी राज्य केले नाही. जगातील १० टक्के प्राण्यांच्या जाती या थायलंडमध्ये आहेत.