हॉटेल्स मध्ये पांढऱ्या रंगाच्या बेडशीट व चादरी का वापरतात ?

आपण नेहमी अनेक पर्यटन स्थळांना भेटी देत असतो. तेव्हा आपण अनेक हॉटेल्स आणि धर्मशाळेत राहतो. तेव्हा आपण रूम्स घेतो आणि रूममध्ये प्रवेश करताच आपल्याला बेडशीट , चादर सर्वकाही पांढरेशुभ्र दिसते ,तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो. अरे हॉटेल्स आणि धर्मशाळेत इतकी वर्दळ असून देखील येथे पांढरे बेडशीट व चादर का वापरत असतील ? आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.

पांढरा रंग स्वच्छतेचे प्रतीक – पांढरा रंग हे शुभ्रतेचे प्रतीक आहे. पांढऱ्या रंगावर स्वछता दिसून येते. जर पांढरा रंग वापरला तर स्वछता दिसून येते . रूम स्वच्छ दिसते. ग्राहकांना स्वच्छता असलेलया रूमला रूमला पसंती देतात. रूम स्वच्छ असेल तर ग्राहक लगेच बुकिंग करतात अशा प्रकारे हॉटेल्सवाले ग्राहकांना पटविण्यासाठी पांढऱ्या रंगाला प्राधान्य देतात.

ग्राहक सुद्धा  घेतात काळजी –  पांढऱ्या रंगावर काही देखील सांडले तरी ते लगेच दिसून येते. ग्राहकांना  जेव्हा रूम दिली जाते ,तेव्हा ग्राहकांना देखील  काही काळ तेथे थांबायचे असते ,त्यामुळे ते त्या रूमला आपलीशी करतात. त्यामुळे पांढऱ्या बेडशीट व चादरीवर काही सांडणार तर नाही ना यांची काळजी थोडीफार तरी घेतातच ,त्यामुळे रूम  काही प्रमाणात तरी स्वच्छ राहतेच.

ब्लीच करण्यासाठी सोप्पे – पांढऱ्या कपड्याना ब्लीच करणे सोप्पे जाते. ब्लीच केल्यानंतर कपडे स्वच्छ दिसतात. आणि ब्लीच करणे परवडते.

ग्राहकांना निवांत वाटते – पांढरा रंग शुभ्रतेचे प्रतीक आहे. पांढरा रंग पहिल्या नंतर मनाला एक वेगळीच शांतात लाभते. त्यामुळे पांढरा रंग वापरला जातो. शिवाय हॉटेल मध्ये बाहेर कुठेतरी फिरायला गेल्यावरच आपण थांबतो. रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळ मिळावं, शांतता मिळावी, आनंद मिळावा म्हणून बहुतेक लोक हॉटेलमध्ये थांबतात. त्यामुळे शांती आणि प्रसन्न वाटावे म्हणूनही हा रंग आपल्याला ह्या हॉटेल रूम्समध्ये बघायला मिळतो.

हॉटेल म्हणजे एक प्रकारचा ब्रॅण्ड असतो– तेथील ठरवलेली प्रत्येक गोष्ट सुसंगत असते त्यामुळे प्रत्येक हॉटेल मध्ये विशिष्ट रंग, आर्टवर्क किंवा इतर गोष्टीत पाहायला मिळतात. हॉटेल मॅनेजमेंटचा नेहमीच सर्व गोष्टी ह्या मिळत्या जुळत्या रंगाच्या ठेवत असतात. त्यातच प्रत्येक गोष्ट ही एकाच रंगाची मिळणे जरा अवघड असल्याने त्यावर पांढरा रंग हा पर्याय असू शकतो. कारण हा रंग सहज उपलब्ध होतो. त्यामुळेच हॉटेल मध्ये पांढऱ्या बेडशीट्स असतात ?