Articles Health

अबब…! ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी, किंमत बघून तुम्हीही आश्चर्य चकित व्हाल.

आपल्या रोजच्या आहारामध्ये दूध, अंडी, फळे यांच्यासोबतच भाज्यांचे सुद्धा सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. निरोगी शरीरासाठी भाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करणे खूप गरजेचे आहे .भाज्या ह्या आपल्या परसबागेतील भाज्यांपासून सुद्धा मिळू शकतात किंवा बाजारामध्ये अगदी निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध होतात. सध्याच्या काळामध्ये देशी भाज्यांचे सोबतच विदेशी भाज्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहारात वापरल्या जातात व त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे. काही हंगामांमध्ये भाजीपाल्याचे दर अचानक वाढतात अशी ओरड ग्राहकांकडून केली जाते मग त्या काळामध्ये भाजीपाल्याऐवजी कडधान्यांचा वापर केला जातो. मात्र काही भाज्या सर्वच हंगामांमध्ये अत्यंत महागड्या असतात की ज्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणाऱ्या नसतात. आज आपण अशाच भाजीविषयी जाणून घेणार आहोत जी तिच्या महागड्या किमतीसाठी व त्याचबरोबरीने पोषणमूल्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

हॉप शुट ही जगातील सर्वात महागडी भाजी म्हणून ओळखली जाते. हाँप शुटची किंमत ही विदेशी चलनामध्ये 1000  युरो प्रतिकिलो म्हणजेच भारतीय चलनामध्ये हाँप शुट ची किंमत प्रति किलोमागे 80 हजार रुपये इतकी आहे आणि सामान्य माणसाच्या आवाक्यापलीकडे आहे. हाँप शुट ही  प्रामुख्याने बेल्जियम आणि हाँलंड  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते व आहारात वापरली जाते.हाँप शुट ही बारमाही भाजी आहे आहे मात्र हिवाळ्यामध्ये या भाजीचे उत्पादन घेणे फारसे चांगले मानले जात नाही. हॉप शुट चे उत्पादन हे मार्च ते जून या काळामध्ये घेतले जाते.

हाँप शुटचा वापर हा रोजच्या आहारात त्याच्या फांद्यांना कांद्याप्रमाणे सँलडमध्ये घालून केला जातो. हाँप शुट ग्रील करूनही खाल्ले जाऊ शकते किंवा याचा वापर हा लोणच्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो। हाँप शुटचा  वापर प्रामुख्याने बियर बनवताना एक विशिष्ट स्वाद व गंध येण्यासाठी केला जातो. अकराव्या शतकामध्ये जेव्हा हाँप शुटचा शोध लावला गेला तेव्हा त्याचा सर्वात प्रथम वापर हा बियर मध्ये एक विशिष्ट चव येण्यासाठीच केला गेला मात्र नंतरच्या काळामध्ये हाँप शुटला आयुर्वेदिक वनस्पती म्हणून ओळखले जाऊ लागले.

हाँप शुट या वनस्पतीमध्ये एंटीऑक्सीडेंट  गुणधर्म असतात .यामुळे  त्वचेला चिरतरुण राखता येते तसेच त्वचेवर होणारी जळजळ सुद्धा हाँप शुटच्या सेवनामुळे नाहीशी होऊ शकते .या वनस्पतीमध्ये नैसर्गिकपणे  असलेल्या तेलाने आणि क्षारामुळे त्वचेचा दाह कमी होतो.हाँप शुटमध्ये असलेल्या दाहक्षामक या गुणधर्मांमुळे अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये याचा वापर केला जातो.

हाँप शुटमध्ये निसर्गतः असलेल्या तेलामुळे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत प्रभावशाली औषध ठरते. हाँप शुट केसांच्या मध्ये लावल्यामुळे केसांमधील कोंडा दूर होतो व केस गळण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते.

हाँप शुटच्या आरोग्याविषयी चे अन्य फायदे म्हणजे ही भाजी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते.हाँप शूट मुळे शरीरातील नसा मोकळया होऊन खूप पटकन चिंताक्रांत होणाऱ्या व्यक्तींना आराम मिळतो. झोप न येणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा हाँप शुट हे  एक प्रकारे वरदानच आहे .हाँप शुटच्या सेवनामुळे किंवा हाँप शुटचे तेल लावल्यामुळे शांत झोप लागते.ही भाजी दातांच्या दुखण्यावर खूप पूर्वीपासून  वापरला जाणारा उपाय आहे.