fbpx

वयाच्या 23 व्या वर्षी स्वबळावर अरबपती झाले जुकेरबर्ग

वयाच्या 23 व्या वर्षी स्वबळावर अरबपती झाले जुकेरबर्ग

‘प्रश्न हा नाही की लोक तुमच्याविषयी काय जाणून घेऊ इच्छिता, मात्र प्रश्न हा आहे की लोक त्त्यांच्या बद्दल काय सांगू इच्छिता’, हे वाक्य मार्क जुकेरबर्गने 2011 मध्ये आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हंटले होते. फेसबुकसाठी मार्कने म्हंटलेले हे वाक्य सांगते की फेकबुकशिवाय लोकांसाठी जनसंवादाचे दुसरे कोणते चांगले माध्यम नाही. फेसबुकच्या जबरदस्त यशामुळे मार्क जुकेरबर्ग 2007 मध्ये अरबपती बनले होते. तेव्हा ते फक्त 23 वर्षाचे होते.

Mark Zuckerberg - Being Marathi
Mark Zuckerberg – Being Marathi

मार्कच्या जिद्द आणि चिकाटीच्या अंदाज यावरून येतो की वयाच्या 12 व्या वर्षापासूनच त्त्यांना कंप्युटर आवडायचा. वडिलांनी त्त्यांना C++ या नावाचे पुस्तक भेट दिल्यावर त्याची प्रोग्रॅम डेंव्हलपमेंटकडे आवड निर्माण झाली.त्यानंतर मार्कने एक असा बेसिक मेसेजिंग प्रोग्रॅम बनवला होता की ज्याचा वापर त्यांचे वडील आपल्या डेंटल ऑफिसमध्ये करायचे. या प्रोग्रॅमद्वारे त्त्यांची रिसेपशनिस्ट त्यांना इंफॉर्म करायची.

Mark Zuckerberg - Being Marathi
Mark Zuckerberg – Being Marathi

जुकेरबर्ग यांच्या मते ‘यशाची एक गॅरेंटी आहे की लाईफमध्ये रिस्क घेणे.’ मार्कला कधीच नोकरीचा लोभ नव्हता. 17 व्या वर्षी मार्कने मित्रांसोबत ‘सिनेप्स मीडिया प्लेअर’ बनवला होता की ज्यात युजर आपल्या आवडीचे गाणे स्टोर करू शकत होता.

Mark Zuckerberg - Being Marathi
Mark Zuckerberg – Being Marathi

जुकेरबर्गला शिकण्याची इतकी आवड होती कि त्यांनी फेसबुक बनवायच्या आधी ‘फेसेसमास’ नावाची एक वेबसाईट बनवली होती. या वेबसाईटवर 2 विद्यार्थ्यांच्या फोटोची तुलना करून कोण जास्त आकर्षक आहे हे सांगितलं जायचं. या वेबसाईटमुळे शाळेमध्ये खूप वाद झाले. विद्यार्थांचं म्हणणं होत कि यामुळे त्त्यांच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ होत आहे. परंतु मार्क हिम्मत हरले नाही आणि त्यानंतर फेसेसमासचे युजर्स 10 लाख पर्यंत गेले.

Mark Zuckerberg - Being Marathi
Mark Zuckerberg – Being Marathi

2004 मध्ये जुकेरबर्गने मित्रांसोबत ‘द फेसबुक’ नावाची एक अशी साईट बनवली कि ज्यात युजर आपलं प्रोफाइल बनवून फोटो अपलोड करू शकत होता. या वर्षाच्या अखेरीस फेसबुक युजर्सची संख्या 1 मिलियनपर्यंत पोहोचली. 2005 मध्ये वेंचर कॅपिटल एक्सेल पार्टनरने फेसबूकमध्ये 12.7 मिलियन डॉलर रुपयांची गुंतवणूक केली.

Mark Zuckerberg - Being Marathi
Mark Zuckerberg – Being Marathi

2010 मध्ये पर्सन ऑफ द इयर आणि फॉर्ब्स यांनी जगातील सर्वांत सामर्थ्यवान लोकांममध्ये मार्क यांना 35 वा क्रमांक दिला. फेसबुकचे सीइओ म्हणून जुकेरबर्ग यांची सॅलरी 1 डॉलर इतकी आहे.

Mark Zuckerberg - Being Marathi
Mark Zuckerberg – Being Marathi

2010 मध्ये अमेरिकेत मार्क जुकेरबर्ग यांच्या जीवनावर आधारित ‘द सोशल नेटवर्क’ या चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच 2013 मध्ये फेसबुकने फॉर्च्युनच्या लिस्टमध्ये आपली जागा बनवली.

Mark Zuckerberg - Being Marathi
Mark Zuckerberg – Being Marathi

 

Rupal Deshmukh