Celebrities

400 कोटींचे विमान, 315 कोटींचा मोबाईल आणि बरंच काही! जाणून घ्या नीता अंबानी यांचा थाट

400 कोटींचे विमान, 315 कोटींचा मोबाईल आणि बरंच काही! जाणून घ्या नीता अंबानी यांचा थाट

श्रीमंत आणि बड्या व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाविषयी अनेकांना आकर्षण असते. मात्र प्रत्येकाला श्रीमंत व्यक्ती बनता येतेच असे नाही. अनेकदा प्रचंड मेहनत करून मनुष्य मोठ्या स्थानावर पोहोचू शकतो. मात्र जगातील असे काही श्रीमंत व्यक्तिमत्व आहेत ज्यांची बरोबरी करणे सामान्य माणसाला अवघड आहे. यापैकीच एक म्हणजे भारतातील अंबानी कुटुंबीय होय.

आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची नोंद आहे. अनेकदा त्यांच्या श्रीमंतीच्या चर्चा रंगत असतात. त्यांचं मुंबईतील आलिशान घर असो कि महागड्या गाड्या असोत याविषयी अनेकांना कुतूहल वाटते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या उंची जीवनशैलीमुळे त्यादेखील प्रसिद्धीच्या झोतात असतात. जाणून घेऊयात नीता अंबानी यांच्या श्रीमंती थाटाविषयी.

महागडा चहा : सामान्य माणसाला अगदी 5 रुपयाला चहा मिळत असला तरी नीता अंबानी यांच्या चहाची किंमत अनेकांचे डोळे दिपतील अशी आहे. नीता अंबानी या रोज सकाळी जवळपास 3 लाख रुपये किंमत असलेला चहा घेतात. तसेच ज्या कपातून त्या चहा घेतात तो कप सोन्याने बनलेला आहे. हा कप जपानची नोरी टेक ही कंपनी बनवते.

महागडी साडी : नीता अंबानी यांच्या साड्यांची चर्चादेखील माध्यमांच्या चर्चेचा विषय बनते. याचे कारणही तसेच आहे. नीता अंबानी जी साडी घालतात त्या साडीची किंमत जवळपास 30 लाखांच्या आसपास असते. या साड्या सोन्याच्या तारांपासून बनलेल्या असल्यामुळे या साड्यांची किंमत इतकी प्रचंड असते.

महागडा मोबाईल : नीता अंबानी वापरत असलेल्या मोबाईलची किंमत जवळपास 315 कोटी रुपये इतकी आहे. जगातील सर्वाधिक महाग म्हणून या फोनकडे पहिले जाते. हिरे आणि रत्नजडित असलेला हा फोन पूर्णपणे 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेला आहे. हा मोबाईल अ‍ॅपल कंपनीचा आहे.

प्रायव्हेट जेट : नीता अंबानी यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त मुकेश अंबानी यांनी त्यांना एअरबस 319 हे जेट विमान भेट दिले होते. या विमानाची किंमत जवळपास 400 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. एवढ्या प्रचंड किमतीचे विमान पत्नीला देणारे मुकेश अंबानी हे एकमेव व्यक्ती असावेत.

About the author

Being Maharashtrian