Bollywood Celebrities Entertainment

रेखाजींसारखीच हुबेहूब दिसते त्यांची बहीण राधा, बघा त्यांचे सुंदर फोटो

चित्रपट सृष्टी मध्ये चिरतारुण्य आणि एव्हरग्रीन सौंदर्याचे वरदान मिळालेली तारका म्हणजे रेखा होय. रेखा यांनी आपला फिटनेस आणि सौंदर्य हे वयामध्ये बांधून न ठेवता कायम राखले आहे व त्यांना अनेक जण आपला आदर्श मानतात.

रेखा यांनी केवळ फिटनेस नव्हे तर अभिनयामध्ये सुद्धा नेहमीच स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. सिलसिला ,उमराव जान ,मुकद्दर का सिकंदर यांसारख्या चित्रपटांत सोबतच सध्याच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काही चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना चकित करून सोडले आहे.

कोणताही पुरस्कार समारंभ असो किंवा पार्टी किंवा अन्य कोणताही प्रसंग यामध्ये रेखा जींची एंट्री झाल्याबरोबर सर्वांचा आकर्षण केंद्रबिंदू हा रेखाजी असतात.रेखा जी या नेहमीच अगदी ग्रेसफुल राहतात. त्यांच्या कांजीवरम साडी ,भांगामध्ये कुंकू भरणे, पारंपारिक पेहराव या सर्वांना चाहत्यांकडून खूप लाईक केले जाते व त्यांच्या प्रमाणे राहण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला नेहमी त्यांनी खाजगी ठेवले आहे मात्र नुकतेच रिंकू राकेश नाथ त्यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यामध्ये त्या आपली बहीण राधा हिच्या सोबत हजर राहिल्या होत्या. राधा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कधीकाळी अभिनय करत असे व ती रेखाजीं सारखीच दिसत असे अनेक जण म्हणतात. या सोहळ्यामध्ये रेखा जी खूप वर्षानंतर आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणजे आपल्या बहिणीसोबत हजर होत्या. राधा व रेखाजी  या समारंभामध्ये एकमेकींची कॉपीच वाटत होत्या.

राधा यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये आपले नशीब आजमावले मात्र नंतर त्यांनी उस्मान सईद त्यांच्यासोबत विवाह केला व विवाहानंतर त्या परदेशातच स्थायिक झाल्या.