fbpx
कशी साजरी करतात दहीहंडी

कशी साजरी करतात दहीहंडी

कशी साजरी करतात दहीहंडी

दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याल फोडण्याचा विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो.

काल्यातील प्रमुख घटक आणि कृष्णभक्ती

पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक श्री कृष्णाच्या विविध स्तरावरील भक्तीचे दर्शवतात

पोहे : पोहे हे श्रीकृष्णाला कधीच अंतर न देणाऱ्याचे प्रतीक

दही : वात्सल्य आणि राग अश्या मातृत्वाचे प्रतीक

दूध : गोपींच्या निर्मळ प्रेमळ भक्तीचे प्रतीक

ताक : गोपींच्या विरोधी आणि लटक्या रागाचे प्रतीक

लोणी : सर्वांचे श्रीकृष्णावर असलेल्या निर्मळ निर्मोही प्रेमाचे प्रतीक

आजच्या या माहितीबद्दल देखील तुमचे अभिप्राय comments मधून जरूर कळवा.