Home » ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे…
Education

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे…

सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर शाळा,कॉलेज बंद असले तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे यामुळे राज्य शासनाने याचा विचार करूनच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे.मात्र याबाबत शिक्षक,विद्यार्थी आणि पालक प्रचंड संभ्रमात आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणे खरचं योग्य आहे का? 

कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल घडून आला आहे.आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले असे अनेक बदल सगळ्यांच्या आयुष्यात होत आहेत.जसे की वर्क फ्रॉम होम,स्वच्छतेच्या बाबतीतील नियम,सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई हे सर्व बदल घडून आले आहेत.प्रत्येकाच्या जीवनशैलीत व्यावहारिक,शैक्षणिक आणि मानसिक बदल घडून आलेले दिसून येत आहेत.त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धत.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर काही परिणाम होऊ नये यासाठी ऑनलाईन खूप सारे प्लॅटफॉर्म आहे.जिथे आपण ऑनलाईन लाईव्ह अभ्यास करू शकतो.तर आज आपण ऑनलाईन अभ्यास काय आहे आणि ऑनलाईन क्लास कोणत्या ऍप्स द्वारे करावा याबद्दल माहिती बघू 

ऑनलाईन अभ्यास काय आहे…

जेव्हा आपण आपल्याला माहित नसणाऱ्या कोणत्या विषयाविषयी ऑनलाईन सर्च करून माहिती मिळवतो त्याला आपण ऑनलाईन अभ्यास करणे असे म्हणतो.बेसिकली आपण इंटरनेच्या मदतीने जो काही अभ्यास करतो किव्हा माहिती मिळवतो त्याला ऑनलाईन अभ्यास करणे असे म्हणतात.ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी इंटरनेट वर खूप सारे मार्ग उपलब्ध आहे ज्याद्वारे आपण घरी बसून इंटरनेटच्या मदतीने खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो आणि त्याबद्दल माहिती मिळवू शकतो.

ऑनलाईन अभ्यास  कसा कराल?

ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे जसे की इंटरनेट कनेक्शन,स्मार्टफोन,कंप्युटर आणि एक असा प्लॅटफॉर्म जिथे ऑनलाईन क्लास चालतील तेव्हाच आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो.

ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी काही ऍप्स… 

१) अन अकॅडमी : हा एक ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे खूप सारे शिक्षक लाईव्ह येऊन शिकवतात.या ऍपद्वारे खूप चांगला अभ्यास करता येतो.इथे विद्यार्थी स्वतःच अकाउंट तयार करून ऑनलाईन अभ्यास करू शकतात.

२) हैंगआउट मीट : या ऍपद्वारे विद्यार्थी ग्रुप स्टडी,ऑनलाईन ट्युशन,क्लासेस,वेबिनार आणि व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग करून चांगली माहिती मिळवू शकतो.हँगआऊट मीट मध्ये स्मार्टफोन आणि लॅपटॉप च्या मदतीने व्हिडीओ कोन्फ्रेसिंग करू शकतो.

३) गुगल : हे सगळ्यात मोठं सर्च इंजिन आहे याच्या मदतीने आपण काही शिकू शकतो अभ्यास करण्यासाठी गुगलवर खूप सारे पुस्तके आणि आर्टिकल आहेत.डाउनलोड अभ्यास करू शकतो.

४) यूट्यूब : वर्तमान काळात खूप सारे विद्यार्थी यूट्यूब ची मदत घेतात.यूट्यूबवर असे लाखो चॅनल आहे ज्यावर  केव्हापण ऑनलाईन क्लासेस चालू असतात.यूट्यूबवर आपण आपल्याला जी माहिती लागेल ती सर्च करू शकतो.

तर आज आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणे योग्य की अयोग्य हे बघणार आहोत…

ऑनलाईन शिक्षणाचे तसे बरेच फायदे आहेत जसे की,शाळा सुरू असतांना मुलांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागत होते आणि त्यांच्या टिफिन साठी,मुलांना शाळेत वेळेवर नेऊन सोडवणे पालकांची ही कामे टळल्यामुळे त्यांना अधिक वेळ मिळत आहे.तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे कम्प्युटर,इंटरनेट,लॅपटॉप या सर्व गोष्टी हाताळता येत आहेत.

पण ऑनलाईन शिक्षणामुळे जसे फायदे आहे त्याबरोबर तोटे देखील आहे.कारण पालक मुलांबरोबर काही वेळ सोबत असायचे परंतु ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे ते २४ तास सोबत राहत आहे.त्यामुळे घरात वाद देखील होत आहे आणि मुलांमध्ये आळस आणि चिडचिडेपणा निर्माण होत आहे.

त्यांची सकाळी लवकर उठण्याची सवय मोडत आहे तसेच काही विद्यार्थी इंटरनेटचा दुरुपयोग देखील करत आहे.जसे की ऑनलाईन व्हिडिओ पाहणे,गेम खेळणे यामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे कारण मोबाईलच्या स्क्रीन मुळे डोळ्यावर ताण पडतो.तसेच मान दुखणे,पाठ दुखणे हे आजार जाणवत आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांना एकटे एकटे राहण्याची सवय लागत आहे.जर हेच शिक्षण शाळेत घेत असते तर मुलांमध्ये एकजुटीने राहण्याची भावना निर्माण होते.एकत्र शिक्षण घेतल्यामुळे मिळुन-मिसळुन राहण्याची सवय होते.त्यांच्या मध्ये मैत्री निर्माण होते आणि एकमेकांना मदत करण्याची भावना निर्माण होते.

पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे असे काहीच घडत नाहीये.सर्वात मोठी समस्या म्हणजे इंटरनेट उपलब्धता कारण सर्वच भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे असे नाही आणि सर्वांच्याच पालकांकडे कॉम्प्युटर,टॅब असेल असे देखील नाही.कारण शाळेमध्ये सर्वस्तरामधील मुले असतात यात शेती काम,मजुरी करणार्यांची मुले देखील असतात त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणे शक्य असेल असे नाही.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा आणि विजेच्या समस्येमुळे या भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहे.इंटरनेट सुविधा सगळ्यांकडेच उपलब्ध असेल असे नाही अनेक भागांमध्ये इंटरनेटच्या समस्या असल्यामुळे व्हिडिओ डाउनलोड होत नाही,लिंक ओपन होत नाही. 

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी खरोखरच अभ्यास करत आहे की नाही हे समजु शकत नाही.ऑनलाईन शिक्षण पद्धत खरचं योग्य आहे की अयोग्य यावर विचार करणे खरचं खुप गरजेचे आहे.