Home » RTE २५% योजने अंतर्गत तुम्हाला तुमच्या पाल्याचा इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश घ्यायचाय तो ही मोफत तर वाचा ही सविस्तर माहिती…!
Education

RTE २५% योजने अंतर्गत तुम्हाला तुमच्या पाल्याचा इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश घ्यायचाय तो ही मोफत तर वाचा ही सविस्तर माहिती…!

महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना अश्या आहेत ज्या सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नाही. आज आपण अश्याच  एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत आणि ही योजना मध्यम वर्गीय पालकांचे स्वप्न पूर्ण करणारी आहे. त्यांचे लाखो रुपये वाचवू शकते तर हा विडिओ शेअर करून नक्कीच सर्व सामान्य पालकांपर्यंत पोहचवा ही  विनंती. 

नमस्कार बीइंग महाराष्ट्रीयन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण RTE बद्दल जाणून घेणार आहोत. RTE Admission संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्हाला इथे मिळेल. जसे की RTE Admission साठी मुलाची वय मर्यादा किती लागते? कोणत्या कोणत्या वर्गात आपण Admission घेऊ शकतो? पालकच उत्पन्न किती पाहिजे? Documents काय काय लागतात? RTE Admission साठी किती जागा असतात?  फॉर्म कसा भरायचा या सर्व प्रश्नांचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे 

प्रश्न १ –  RTE मधून कोणत्या कोणत्या वर्गात Admission घेता येत

तुम्ही RTE Admission हे चार वर्गासाठी घेऊ शकता, नर्सरी, जुनियर केजी, सिनियर केजी, पहिली 

प्रश्न २ –  RTE Admission साठी मुलाची वय मर्यादा किती लागते?

२८ फेब २०२२ च्या GR नुसार 

नर्सरी –  ४ वर्ष ५ महिने ३० दिवस 

जुनियर केजी  – ५ वर्ष ५ महिने ३० दिवस 

सिनियर केजी – ६ वर्ष ५ महिने ३० दिवस

पहिली – ७ वर्ष ५ महिने ३० दिवस 

प्रश्न ३ – पालकच उत्पन्न किती पाहिजे?

३) उत्पन्नाचा दाखला : तहसीलदार / नायब तहसीलदार / महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले प्रमाणपत्र.

प्रश्न ४ – RTE ऑनलाईन प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. 

 १) रहिवासी प्रमाणपत्र : आधार कार्ड / पासपोर्ट / टेलिफोन बिल / वीजबिल / घरपट्टी /दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरनामा / वाहन चालवण्याचा परवाना. यापैकी कोणतेही एक. 

 २) जातीचे प्रमाणपत्र (पालकाचे ) : तहसीलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र. 

 ३) उत्पन्नाचा दाखला : तहसीलदार / नायब तहसीलदार / महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले प्रमाणपत्र.

४) जन्माचा दाखला : ग्रामपंचायत / नगरपंचायत / महानगरपालिका यांचा दाखला / अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला. 

५) घटस्फोटित महिला : न्यायालयाचा निर्णय/ घटस्फोटित महिलेचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असेल तर बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र / आर्थिक दुर्बल असेल तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. 

प्रश्न ५ – RTE Admission साठी किती जागा असतात?

RTE Admission साठी २५% जागा उपलध असतात. 

प्रश्न ६ – RTE Admission कधी चालू होणार आणि फॉर्म कसा भरायचा 

RTE Admission फेब end मध्ये चालू होतील त्या साठी आमचे youtube, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, या सोसिअल मीडिया चॅनेल ला सुब्स्क्रिब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ठेवा जेणेंकरू नवीन उपडेट ची माहिती नोटिफिकेशन द्य्वारे मिळेल. 

Facebook – https://www.facebook.com/beingmaharashtrian

Youtube – https://www.youtube.com/channel/UCrshpp5uOJ-zsKRnsERRvkg

Twitter – https://twitter.com/being_mahara

Linkedin – https://www.instagram.com/beingmaharashtrian.in/