Bollywood Entertainment

प्रसूतीनंतर आठव्या दिवशी अभिनेत्री ने अपलोड केले सुपरफिट अवतारातील फोटो

लाँकडाऊन काळामध्ये काही सेलिब्रिटींनी नवीन भूमिकेमध्ये प्रवेश केला आहे ही भूमिका म्हणजे मातापित्यांची भूमिका होय अर्थातच लाँकडाऊन काळामध्ये काही सेलिब्रिटींनी चिमुकल्या जीवाला जन्म दिला आहे व आयुष्यातील हा बद्दल ते पूर्ण एनर्जीने अनुभवत आहेत.

आपल्या या नवीन चिमुकल्या जीवासोबतचे क्षण अनेक फोटोज सोशल मीडियावर ते अपलोड करत आहेत .या सेलिब्रिटी पैकीच एक म्हणजे मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेतील स्मृती खन्ना होय.स्मृती ने 15 एप्रिल रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून ती आपल्या मुलीच्या जन्मानंतर खूप आनंदात आहे.

आपला आनंद ती  सोशल मीडियावर निरनिराळी छायाचित्रे अपलोड करून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे.स्मृती ने अपलोड केलेल्या छायाचित्रांनी  चाहत्यांना मिळणाऱ्या सुखद धक्का म्हणजे स्मृतीचा एका मुलीला जन्म दिल्यानंतरही असलेला फिटनेस होय।

रूग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या मुली सोबत स्मृतीने एक फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता ज्यामध्ये साधारणतः प्रसूतीनंतर सुटलेले पोट किंवा वाढलेले वजन या कोणत्याही घटकांचा मागमूस नव्हता.

स्मृती एकदम फिट आणि स्लिम दिसत होती त्यामुळे तिचे चाहते एकदम हैरान झाले. यानंतर नुकतेच स्मृतीने प्रसूतीनंतर आठव्या दिवशी वर्कआऊट केल्यानंतर आपले ॲब्ज दाखवणारा एक फोटो इन्स्टा स्टोरी वर अपलोड केला आहे .तिचा हा लुक बघून तर तिने नुकतेच एखाद्या बाळाला जन्म दिला आहे का अशी शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

 हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी आल्याबरोबर स्मृतीने आपले वर्कआउट  पूर्वीप्रमाणे सुरू केले आहे.