Home » पृथ्वी शॉ करतोय सुपर हॉट मॉडेलला डेट फोटो पाहून थक्क व्हाल
Entertainment

पृथ्वी शॉ करतोय सुपर हॉट मॉडेलला डेट फोटो पाहून थक्क व्हाल

क्रिकेटचे मैदान आणि बॉलीवुड यांचे कनेक्शन खूप जुने आहे. आज घडीच्या अनेक युवा क्रिकेटपटूंनी बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींसोबत सुखासमाधानाने संसार सुद्धा थाटला आहे यामध्ये विराट कोहली ,जहीर खान यांच्या नावांचा समावेश होतो. अगदी सुरुवातीच्या काळात देखील शर्मिला टागोर आणि नवाब पटौदी हेसुद्धा याचे एक आदर्श उदाहरण आहेत. सध्याच्या पिढीमध्ये क्रिकेटपटू आणि बॉलिवूड आणि मॉडलिंग मधल्या सौंदर्यवती एकमेकांना डेट करत असल्याचे अगदी सर्रास दिसून येते.यामध्ये एका तरुण क्रिकेटपटूची भर पडली आहे तो क्रिकेटपटू म्हणजे पृथ्वी शॉ होय.पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राचीन सिंग एकमेकांना डेट करत असल्याचे त्यांच्या चाहत्यांचे व प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे. इन्स्टाग्रामवर या दोघांची एकमेकांसोबत ची छायाचित्रे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या ना जणूकाही आधारच देतात.पृथ्वी ना खूप कमी वयामध्ये क्रिकेट च्या मैदानावर स्टार ठरलेला खेळाडू आहे.

पृथ्वीने आपल्या क्रिकेटचे धडे हे मुंबईमध्ये गिरवण्यास सुरुवात केली असली तरीही तो मूळचा बिहारचा आहे.पृथ्वी  चा जन्म 9 नोव्हेंबर 1999 रोजी गया येथे झाला.पृथ्वीचे वडील हे सुरुवातीपासूनच त्याला क्रिकेट मध्ये येण्यासाठी पाठिंबा देत असत. त्याची आई सुद्धा त्याला एक स्टार क्रिकेटर करण्याची इच्छा बाळगून होती.मात्र त्याच्या आईचे त्याच्या लहानपणीच निधन झाले व त्यानंतर त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी वडीलांवर पडली. सुरुवातीची काही वर्षे गया येथेच राहिल्यानंतर 2010 साली पृथ्वीने मुंबईची वाट धरली. तो आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईमध्ये स्थायिक झाला.

क्रिकेट या खेळावर पृथ्वीची निस्सीम भक्ती होती व यामुळेच क्रिकेट शिकण्यासाठी तो विरार ते चर्चगेट असा दररोज प्रवास करत असे.तसेच तो क्रिकेटमधील अजून काही तंत्र शिकण्यासाठी इंग्लंडलाही  जाऊन आला. पृथ्वी मध्ये एका खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरी सोबतच नेतृत्व गुणही ठासून भरले आहेत‌ याचा प्रत्यय ग्रीनफिल्ड स्प्रिंग हायस्कूल’मध्ये अंडर सिक्सटीन क्रिकेट संघाचे कर्णधारपद त्याने भूषवले होते त्यावेळी आला. मुंबईतील एमआयजी क्रिकेट क्लब मध्ये पृथ्वीने क्रिकेटचे शिक्षण घेतले.

भारतीय संघाच्या अंडर नाईन्टीन क्रिकेट संघाचे नेतृत्व पृथ्वी ने केले आहे व त्याच्या नेतृत्वाखाली 2018 सालचा क्रिकेटचा विश्वविजेतेपद भारतीय संघाने पटकावला. 2018साली पृथ्वीला अधिक व्यापक असे व्यासपीठ मिळाले .2018साली आयपीएल स्पर्धांच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाने पृथ्वीला करारबद्ध केले‌ पृथ्वीला 1.2 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध करून घेण्यात आले. पृथ्वी आयपीएल मध्ये खेळणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू आहे.त्याने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आयपीएल मध्ये पदार्पण केले.

आयपीएलच्या सामन्यांमध्ये पृथ्वीने अनेकविध विक्रम केले आहेत. पृथ्वी  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये 55 चेंडूंमध्ये 99 धावा केल्या होत्या.सचिन तेंडुलकर यांच्यानंतर पृथ्वी हा पदार्पणातील टेस्ट क्रिकेट मॅच मध्ये शतक करणारा पहिलाच खेळाडू आहे‌. तसेच सर्वात कमी वयामध्ये टेस्ट क्रिकेट मॅच मध्ये शतक झळकावणारा ही तो सचिन तेंडुलकर यानंतरचा पहिलाच खेळाडू आहे.

अतिशय सर्वसामान्य पार्श्वभूमीतून स्वबळावर पुढे आलेल्या पृथ्वीचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याबाबत ही त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता असते व यामध्येच त्याचे नाव प्राची सिंग सोबत जोडले जात आहे. ते एकमेकांसोबत वेळ व्यतीत करताना दिसून येतात व दोघांचाही इंस्टाग्राम अकाउंट वरील त्यांच्या एकत्र फोटोंवरून सध्या ते एकमेकांना डेट करत असल्याचा कयास बांधला जात आहे.या दोघांनीही याबाबत कुठलेही वक्तव्य अजून तरी केलेले नाही.