Home » ‘या’ कारणामुळे नाना पाटेकर यांनी घेतला संजय दत्त सोबत काम न करण्याचा निर्णय…
Entertainment

‘या’ कारणामुळे नाना पाटेकर यांनी घेतला संजय दत्त सोबत काम न करण्याचा निर्णय…

बॉलिवूडमध्ये आपल्या जबरदस्त संवादफेक,उत्कृष्ट अभिनय आणि बिंदास स्वभावामुळे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.नाना पाटेकर यांनी एक जानेवारीला आपला 72वा वाढदिवस साजरा केला.नाना पाटेकर यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.नाना पाटेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याविषयी काही तथ्य आपण जाणून घेणार आहोत.

नाना पाटेकर यांचा‌ जन्म 1 जानेवारी  1951 रोजी झाला.नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर असे होते.मात्र बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अभिनय क्षेत्रासाठी त्यांनी आपले नाव बदलून नाना हे नाव घेतले.नाना पाटेकर यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.नाना पाटेकर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना तेराव्या वर्षापासून काम करून कमावण्यास सुरुवात करावी लागली.नाना पाटेकर शाळेत जात असत व तेथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी चित्रपटाची पोस्टर रंगवण्याचे काम करण्यास जात.या कामातून मिळणा-या कमाई तून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे.

नाना पाटेकर हे खूप मेहनती आणि जिद्दी अभिनेता आहे.1978 साली गमन या चित्रपटाद्वारे नानांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.या नंतर नाना पाटेकर यांनी मागे वळून पाहिले नाही.प्रहार,प्रतिघात यांसारख्या चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी काम केले आहे.यांपैकी बहुतेक चित्रपटांमध्ये नानांचे पात्र हे कोणालाही न घाबरणारा व बिनधास्तपणे वावरणाऱ्या नायकाचे होते.नानांनी केवळ हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये नव्हे तर मराठी चित्रपटांमध्येही काम केले.नाना पाटेकर यांचे वैयक्तिक आयुष्य खूप साधे आहे.नाना पाटेकर यांना वैयक्तिक आयुष्यामध्ये अभिनयाव्यतिरिक्त स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे व त्यांनी एकदा सांगितले होते की अभिनेता पेक्षाही ते चांगले कुक आहेत.नाना पाटेकर यांनी अभिनेत्री नीलवंती यांच्यासोबत विवाह केला होता मात्र सध्या ते विभक्त राहतात.अद्याप त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.

नाना पाटेकर यांनी आपल्या मेहनतीच्या व अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये खूप यश मिळवले आहे. आतापर्यंत त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने व तीनदा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.नाना पाटेकर हे एकमेव कलाकार असतील ज्यांनी केवळ नायकाच्या नव्हे तर खलनायक आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकांसाठी ही पुरस्कार मिळवले आहेत.नाना पाटेकर यांच्या संवाद शैलीचे अनेक चाहते आहेत.नाना पाटेकर यांच्या अभिनयासोबत त्यांच्या संवादशैलीची खूप प्रशंसा केली जाते.त्यांचे अनेक संवाद आजसुद्धा चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

नाना पाटेकर हे बॉलीवूड मधील परिचित व्यक्तीमत्व आहे.नाना पाटेकर हे सर्वच कलाकारांसोबत खूप चांगले संबंध ठेवून आहेत मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना पाटेकर हे अभिनेता संजय दत्त सोबत काम करत नाही.संजय दत्ताचे नाव मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणात आले होते.मुंबई बाॅम्बस्फोटात नाना पाटेकर यांनी आपला भाऊ गमवावा लागला होता.म्हणून ते संजय दत्त यांना कधीही माफ करू शकत नाही.हे एका टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये त्यांनी सांगितले होते की संजय दत्तने त्याच्या केलेल्या कृत्याची शिक्षा भोगली असली तरीही मी त्याला कधीही माफ करू शकत नाही व त्याच्यासोबत मी कधीही काम करणार नाही.