Entertainment Movies

‘हा ‘आहे बॉलीवुडमधील 100 पेक्षा जास्त हिट देणारा अभिनेता; नाव वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

बॉलीवुड मध्ये जेव्हा मूवी रिलीज होते तेव्हा तो शुक्रवार अगदी महत्त्वाचा मानला जातो.मुव्ही चांगली असली तर तो आठवडा काय, अनेक आठवडे तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. या सगळ्यांच्या पुढे सध्या बॉलीवूड गेलेले आहे. आता सध्या रेस असते ती, बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी पेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या मध्ये आपला चित्रपट गाजवण्याची. आज आपण अशा अभिनेत्याची ची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याने एक नाही, दोन नाही, तर तब्बल 100 हून अधिक चित्रपटांना बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ची पाटी लावली!

हा अभिनेता शाहरुख, सलमान किंवा रितिक नाही… हा अभिनेता आहे त्या काळचा जेव्हा त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लागला निर्माता, वितरक, आणि सिनेमा घरांचे मालक देखील भरपूर कमाई करत. कॅन्टीन वाल्यांची सुद्धा भरपूर चलती असे. या अभिनेत्याने स्वतःचा काळ गाजवला मात्र त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यांना देखील मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.

अगदी हेमा मालिनी सारखी अभिनेत्री सुद्धा त्याच्यासोबत चित्रपट मिळावा म्हणून धडपड करत असे. पंजाबच्या मातीतून आलेला तो अभिनेता होता धर्मेंद्र! धर्मेंद्रची फिल्म एखाद्या शहरांमध्ये तब्बल दहा ते पंधरा वेळा पुन्हा पुन्हा रिलीज झालेली आहे. इतक्या वेळा एकच फिल्म पुन्हा पुन्हा रिलीज होणारी ही काही साधी गोष्ट नव्हती.

तितक्याच वेळा प्रत्येकाला तेवढाच नफा मिळवून दिला तो फक्त धर्मेंद्रने! त्याकाळात करोडो रुपयांची कमाई करणे आणि त्या गोष्टीचा उल्लेख देखील न करणे हे फक्त धर्मेंद्र ला जमू शकते. 1960 मध्ये त्याने आपला चित्रपटांचा प्रवास सुरू केला आणि तब्बल चाळीस वर्ष तो हिरो म्हणून काम करत होता.

प्रेक्षकांकडून मिळणारे भरभरून प्रेम, आणि अभिनय क्षेत्रामध्ये डान्स च्या शिवाय सुद्धा प्रेक्षक चित्रपट बघायला येऊ शकतात हे फक्त आणि फक्त धर्मेंद्रने सिद्ध करून मिळवले होते. धर्मेंद्र च्या मनाचा मोठेपणा तिथे दिसून येतो, जमा एखादा निर्मात्याकडून फायदा होत असतानाही जास्त पैसे त्यांनी घेतले नाहीत.

अनेकदा अशा लोकांसाठी चित्रपट केले जे त्यांना पैसे देऊच शकणार नव्हते. अक्षरश: बी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील धर्मेंद्र काम करताना त्याकाळी पाहायला मिळाला. या चित्रपटांमध्ये काम करणे हे पैशासाठी नव्हते तर आपल्या नावामुळे कुणाचा तरी फायदा होतोय ही चांगली गोष्ट आहे असा विचार करून ते काम केले गेले.

त्यामुळे असा अभिनेता या काळात काय पुढच्या काळातही पुन्हा होणे नाही. म्हणूनच धर्मेंद्र हे हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये मोठे नाव तर आहेच आणि ते भारतीय सिनेमासाठी लिविंग लेजंड आहेत.