Entertainment Sports

गोड बातमी! विरुष्का च्या घरी नवा पाहुणा!

प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवा पाहून येणे ही अतिशय मोठी गोष्ट असते. विराट आणि अनुष्का च्या देखील आयुष्यात असाच पाहून येण्याची चाहूल त्यांना लागली आणि त्यांच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लागलं.

विराट कोहली ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आज दुपारी त्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले असल्याची गोड बातमी दिली. सोशल मीडियावर ही बातमी येताच सगळीकडून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होऊ लागला.

“आम्ही हे सांगताना अत्यंत आनंदित आहोत कि, आम्हाला आज दुपारी मुलगी झाली. आम्ही देवाचे अत्यंत आभारी आहोत कि, हे सुख आम्ही अनुभवू शकत आहोत. हा वेगळाच अनुभव आहे. या नव्या चाप्टर ची सुरवात करणे हे आमचे भाग्य आहे. अनुष्का आणि बाळ दोघेही सुखरूप असून, आम्हाला सध्या प्रायव्हसी ची गरज आहे हे तुम्ही समजून घ्याल याची आम्हाला खात्री आहे.” असे देखील त्याने म्हणले आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ने ऑगस्टमध्ये त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर प्रत्येकाला विराट आणि अनुष्का ला मुलगा होणार की मुलगी याची चाहूल लागली. अनेक ज्योतिषांनी त्यांना मुलगीच होणार अशी भविष्यवाणी देखील वर्तवली होती.

About the author

Anuja BM