Actors Actress Articles Bollywood Entertainment Featured Movies National Sports

अनुष्का शर्माचा खुलासा : लग्नाच्या पहिल्या ६ महिन्यात केवळ २१ दिवस बरोबर घालवले

Virat-Kohli-Anushka-Sharma
Virat-Kohli-Anushka-Sharma

बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हि पावरफुल जोडी समजली जाते. आपल्या कामाच्या निमित्ताने दोघांना बरोबर राहण्यास खूप कमी वे मिळतो. त्यामुळे दोघे फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. मात्र सध्या दोघेही एकत्र राहत असून एकत्र उत्तम वेळ घालवत आहेत.सध्या अनुष्काने त्यांच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

तिने याविषयी बोलताना सांगितले कि,लग्नाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये मी आणि विराट केवळ २१ दिवस एकत्र राहिलो होतो. एका फॅशन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला.

याविषयी अधिक बोलताना तिने सांगितले कि, लोकांना असे वाटते कि, मी आणि विराट एकमेकांना भेटतो तेव्हा आम्ही एकत्र वेळ घालवतो, मात्र असे नसून दोघांपैकी एकाच काम चालू असतं. हे खरे असून मी या दिवसांचा हिशोब लावला आहे. मी हे सर्व दिवस मोजले आहेत. मी त्याला परदेशात भेटायला जात असे तेव्हा आम्ही केवळ डिनरसाठीच भेटत असतं. तो वेळ आमच्यासाठी खूपच मौल्यवान होता. त्यामुळे आम्ही तो वेळ वाया घालवत नसू.

तर याविषयी बोलताना विराट म्हणाला कि, आम्ही प्रत्येक दिवस एकमेकांच्या प्रेमामध्ये जगतो. आमचे नात्यामध्ये केवळ प्रेम आणि प्रेमाचं भरलेले आहे. आम्हाला असे वाटते कि, आम्ही एकमेकांना काही वर्षांपासून नव्हे तर अनेक जन्मांपासून ओळखत आहे.

या दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास सध्या दोघेही घरी असून कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील क्रिकेट थांबले असून चित्रपटांचे चित्रीकरण देखील लांबणीवर पडले आहे. आगामी काळात वर्ल्डकप आणि आयपीएलमध्ये आपल्याला विराट कोहली खेळताना दिसून येणार आहे.