Entertainment Movies

आश्रम मधील बबीता ने सांगितले बॉबी देओल सोबतच्या त्या बोल्ड सीनचे तथ्य!

आश्रम ही वेबसिरीज त्यातील बोल्ड सीन्स, त्याचबरोबर स्त्रियांवरील अत्याचार आणि धर्माच्या माध्यमातून लपवला जाणाऱ्या गोष्टी यावर भाष्य करणारी आहे. प्रकाश झा यांची वेबसिरीज एम एक्स प्लेयर वर चांगली व्हीवर्शिप मिळवत आहे. बॉबी देओल च्या कामाची प्रशंसा जेवढी झाली तेवढी चर्चा झाली ती प्रतिभावान अशी अभिनेत्री त्रिधा चौधरी हिच्या कामाची. वाईट मार्गाने वेश्या व्यवसायात अडकलेली मुलगी जेव्हा लग्न करते त्यानंतर काय होते असे तिच्या पात्राचे एकंदरीत रूप आहे.

आश्रममध्ये बॉबी देओल आणि त्रीधा चौधरी यांच्या मध्ये कोणते नाते निर्माण होते, हे स्पष्ट करण्यासाठी काही बोल्ड सीन्स घेण्यात आले आहेत. हे बोल्ड सीन्स नेमके कसे चित्रीत केले? आणि त्या दरम्यान तिची मानसिकता काय होती? यावर त्रिधा खुलेपणाने बोलली.

“लोकांना एक गोष्ट कळत नाही, ती म्हणजे केवळ पडद्यावर अशा भूमिका साकारणे म्हणजे प्रत्यक्षात व्यक्ती तसा असतो असे नाही!” असे तिने बेधडकपणे सांगितले. हे सीन करताना नेमके कसे केले जातात हे लोकांना माहीत नसते आणि म्हणून त्यांचे विचार असे होतात असेही तिने सांगितले.

“बॉबी देओल हा विवाहित आहे. त्याचे विशेष कौतुक यासाठी की त्यांनी मला अनकम्फर्टेबल नाही होऊ दिले.” असे ती बोलते. “हे सर्व सीन्स एका उशीच्या माध्यमाने आम्ही शूट केले. अनेक लोक त्या वेळी सेटवर उपस्थित होते. त्यामुळे मला कोणतीही भीती वाटली नाही” असे ती बोलते. माधुरी दीक्षितला आपला आदर्श मानणारी त्रिधा, तिच्या प्रमाणेच आयुष्याची वाटचाल ठेवण्याचे स्वप्न देखील पाहते. “ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे माझ्यासारख्या मुलीला कमी वेळात यश संपादन करता आले, त्यासाठी मी देवाचे आभार मानते” असे बोलून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.