अभिनेत्री रेखा आजही कुणाच्या नावाने कुंकू लावतात? जाणून घ्या यामागचं रहस्य

अभिनेत्री रेखा आजही कुणाच्या नावाने कुंकू लावतात? जाणून घ्या यामागचं रहस्य

चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा माध्यमांमध्ये अनेकदा रंगात असते. तसेच अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकदा त्यांच्या चाहत्यांनाही रस असतो. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण अशाच एका रहस्यमयी विषयावरील माहिती पाहणार आहोत. अभिनेत्री रेखा कुणाच्या नावाने कुंकू लावतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

जवळपास मागील 4 दशकांहून अधिक कालावधीपासून चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रेखा यांचं खरं नाव ‘भानुरेखा गणेशन’ असे आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक ‘जेमिनी गणेशन’ हे रेखा यांचे वडील होते. रेखा यांना चित्रपटाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाल्याने त्यांनी अत्यंत कमी वयात अभिनय करण्यास सुरुवात केली.

बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देऊन रेखा यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. त्या यशाच्या शिखरावर असताना त्यांचे नाव अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी जोडले गेले. रेखा यांचे नाव विश्वजीत, नवीन निश्वचल, विनोद मेहरा, किरण कुमार, जितेन्द्र, शत्रुघ्न सिन्हा, संजय दत्त, अक्षय कुमार यांच्यासोबतही जोडले गेले. मात्र रेखा यांच्या नात्याचा कधीच जाहीर खुलासा झाला नाही किंवा त्यांचे कुणाप्रती जास्त दिवस संबंध टिकले नाही.

अभिनेता अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील जवळीकीची चर्चा त्याकाळी अख्या फिल्म इंडस्ट्रीत झाली होती. मात्र अमिताभ यांचे लग्न जया बच्चन यांच्याशी झाल्यामुळे रेखा आणि अमिताभ यांचे प्रेम पूर्णत्वास गेले नाही. मात्र रेखा आजही अमिताभ यांच्या प्रेमापोटी आजही कुंकू लावतात अशी चर्चा आहे. याव्यतिरिक्त रेखा स्वतःचे सौंदर्य खुलावे यासाठी कुंकू लावतात असंही सांगितलं जातं.

रेखा यांचा विवाह 1990 साली उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर 3 महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही दिवसानंतर मुकेश यांनी आत्महत्या केली. रेखा सध्या मुंबईतील बांद्रा येथील घरी एकट्याच राहतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंविषयी आजही अनेक जण अनभिज्ञ आहेत.