Bollywood Entertainment Prank

मी ज्या अभिनेत्रीच्या हातावर थुंकतो तिला भविष्यामध्ये खूप प्रसिद्धी व यश मिळाले : अमीर खान

Aamir Khan and Madhuri
Aamir Khan and Madhuri

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आपल्या विविधांगी भूमिकां सोबतच सामाजिक विषयांप्रती भान आणि सामाजिक उपक्रमां मधील सहभागाबद्दल सुद्धा त्याच्या चाहत्यांच्या आदरास पात्र ठरला आहे. आपल्या या भूमिका या अगदी 100% तंतोतंत साकारणे यावर अमीरने नेहमीच भर दिला त्यामुळे तो एका वेळी एकाच चित्रपटात मध्ये काम करतो.

अशा अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या परफेक्शनिस्ट आमिर खान खाने एकदा एक  स्टेटमेंट केले होते ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. हे विधान म्हणजे ज्या अभिनेत्रीच्या हातावर मी थुंकतो तिला भविष्यामध्ये खूप प्रसिद्धी व यश मिळाले  असे अमीरने म्हटले होते.  सामाजिक भान नेहमीच जपणाऱ्या अमीरच्या विधानावर अनेक प्रतिक्रिया.

उमटल्या मात्र जेव्हा खरे कारण कळले  तेव्हा  आमिरच्या  स्वभावाची अजून एक  छटा समोर आली. अमीरच्या स्वभावामध्ये प्रँक करण्याची जी मिष्किल छटा  आहे त्याबद्दल चाहते जरी अनभिज्ञ असले तरी अनेक सहकाऱ्यांनी आमीरच्या प्रँकचा स्वतः अनुभव घेतलेला आहे . आमिरचे एक ठेवणीतले प्रँक म्हणजे अमीर असे सांगत असे की त्याला ज्योतिषशास्त्र खूप चांगल्या प्रकारे अवगत आहे व तो  तळहाता वरील रेषा बघून भविष्य सांगू शकतो .

अमीरने असे सांगितल्यावर सेटवरील  त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री त्याच्यासमोर तळ हात धरत असत व त्याला आपले भविष्य वर्तवण्यास सांगत असत.त्यावेळी जणू काही त्याला खरोखरच भविष्य सांगता येते असा  अभिनय करत अमीर  तिचा हात हातात घेत असे व त्यावर थुंकत असे.आमीरने ह्या प्रँकचा जवळपास सर्वच अभिनेत्रींवर प्रयोग केला आहे व या प्रँकला  काही अभिनेत्रींनी एक चेष्टा-मस्करी चा भाग म्हणून स्वीकारले तर काहींना इतका राग आला की त्यामुळे अमीर आणि त्यांचे संबंध ताणले गेले.

 इश्क या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सेटवर अमीरने जुही चावलाला आपल्याला हात बघून भविष्य सांगता येते असे सांगितले त्यावर अतिशय उत्साहाने जुहीने आपला  हात अमीरसमोर धरला. आमीरने क्षणाचाही विलंब न करता तिच्या तळहातावर थुंकले ।यावेळी सेटवर सगळा क्रू उपस्थित होता .सर्व क्रू च्या समोर जुहीला अमीर ने केलेले हे प्रँक अतिशय अपमानास्पद वाटले.त्यामुळे दुसऱ्या दिवशी व्यथित होऊन ती शूटिंगसाठी सेटवर आली नाही.

आपल्या प्रँकला चेष्टामस्करी च्या स्वरूपात न घेता चिडलेल्या जुही मुळे अमीर सुद्धा खूप चिडला होता व नंतर अनेक वर्षं अमीर आणि जुही एकमेकांसोबत चित्रपटांमध्येही झळकले नाहीत किंवा वैयक्तिक आयुष्यातही त्यांचे कोणते संबंध नव्हते. अगदी नजिकच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा पँच अप झाले आहे.

अमीरने हे.प्रँक दिल या चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री माधुरी दीक्षित सोबतसुद्धा केले होते.खंबे जैसी खडी है या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी अमीरने आपल्याला ज्योतिषशास्त्र  खूप चांगले अवगत असल्याचे सांगितले. त्यावेळी माधुरीने आपला हात समोर करून भविष्य वर्तवण्यास सांगितले आणि क्षणात अमीर तिच्या हातावर थुंकून पळाला.हे एक प्रँक आहे हे लक्षात आल्यावर माधुरीसुद्धा त्याच्यामागे सेटवर पडलेली हाँकी स्टिक घेऊन.मारायला धावली व या प्रँकला चेष्टामस्करी चे स्वरूप दिले.

अठराव्या मुंबई फिल्म फेस्टिवल च्या प्रसंगी जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील कलाकारांच्या रीयुनियनच्या वेळी फराह खान यांनी कशाप्रकारे आमिर सुरुवातीच्या  काळात अभिनेत्रींच्या हातावर थुंकत असे हे सांगितलं यावेळी उपस्थित असलेल्या अमिरने त्याने ज्या अभिनेत्री च्या हातावर थुंकले.ती नंबर एकची अभिनेत्री बनली असा हसत हसत बचाव केला.

About the author

beingmaharashtrian