Bollywood Entertainment

खसलमान खान आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांची दिवाळीमध्ये जुगलबंदी

बॉलीवूड मधील  चित्रपट भव्य दिव्य आणि बिग बजेट असतात. या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी सर्व प्रकारचे फंडे वापरले जातात. या चित्रपटांच्या बाबतीत प्रेक्षकांमध्ये चाहत्यांमध्ये आधीपासूनच उत्सुकता निर्माण करण्यासाठी याच्या तारखा ट्रेलर रिलीज करण्या बरोबर घोषित केल्या जातात व एक प्रकारे असे उत्कंठेकडे नेणारे वातावरण निर्माण केले जाते. शाहरुख खान ,सलमान खान ,आमिर खान अक्षय कुमार, अजय देवगन यांच्या चित्रपटांना बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नेहमीच असते व त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या बातम्या आल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटांची वाट पाहत असतात.

मात्र हे चित्रपट रिलीज करण्याच्या तारखा सुद्धा काही विशिष्ट मुहूर्त किंवा दिवस पाहूनच ठरवल्या जातात यामागे कधीकधी संबंधित निर्माता, दिग्दर्शक किंवा अभिनेता यांच्या श्रद्धा असतात किंवा त्या काळामध्ये सुट्ट्या किंवा सणवार असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहाकडे ,खेचली जाऊ शकेल असे आर्थिक समीकरण सुद्धा त्यामागे असते. कोरोनामुळे लाँक डाऊनची परिस्थितीमुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रावरही मोठा परिणाम घडून आल्याचे दिसते.

बहुतांशी चित्रपट हे सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जात आहेत व या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेल्या चित्रपटांना ही चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या तगडी स्टारकास्ट असलेल्या लक्ष्मी बॉम्ब आणि राधे या चित्रपटांची ईदच्या दिवशी  एकमेकांसोबत टक्कर घडून येणार होती मात्र लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे अक्षय कुमार अभिनय करत असलेल्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाला ओटी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जाणार आहे तर राधे या चित्रपटाचे काही काम बाकी असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे यामुळे या दोन्हींच्या चाहत्यांना चित्रपटांमधील चुरस अनुभवण्याची संधी गमवावी लागली आहे.

सलमान खान व अक्षय कुमार यांच्या चाहत्यांना या दोघांच्या चित्रपटांची जुगलबंदी पाहण्याची संधी ही दिवाळीमध्ये सूर्यवंशी या अक्षय कुमारच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. सूर्यवंशी हा बिग बजेट चित्रपट असून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्या अगोदर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला तर त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे व दिवाळीत पर्यंत पुन्हा एकदा चित्रपट गृह सुरू होतील असा आशावादही व्यक्त केला जात आहे.सलमान खान याचा पुढील चित्रपट राधे असून त्यांचे बहुतेक पोस्टप्रोडक्शनचे काम या काळामध्ये पूर्ण झाले असल्यामुळे हा चित्रपट सुद्धा दिवाळीच्या काळात रिलीज केला जाऊ शकतो त्यामुळे निश्चितच अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या चित्रपटांची पर्वणी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.

About the author

beingmaharashtrian