Bollywood Entertainment

चक्क ६ वर्षांनंतर सुजैन खानने सांगितले ऋतिक सोबतच्या घटस्फोटाचे खरे कारण!

बॉलीवूड मधील काही जोड्या या त्यांच्या प्रेमामुळे खूप चर्चेत राहिल्या आहेत. एकमेकांच्या अखंड प्रेमामध्ये बुडालेल्या या जोड्यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना विशेष धक्का बसला होता.  या घटस्फोटासाठी दिल्या गेलेल्या पोटगीची  रक्कमसुद्धा चर्चेत राहिली आहे. असाच एक महागडा घटस्फोट म्हणजे बॉलिवूडचा क्रिश ह्रितिक रोशन आणि त्याची पत्नी व  प्रेमिका सुजान खान यांचा घटस्फोट होय.

ह्रतिक बॉलीवूडमध्ये येण्या अगोदर पासून सुझानची व त्याची मैत्री होती व ते दोघे एकमेकांना डेट करत होते. ह्रतिक चा पहिला चित्रपट कहो ना प्यार है ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरल्यानंतर ह्रतिक रोशनवर लाखो तरूणी जीव ओवाळून टाकत होत्या. ह्रतिक करिअरच्या यशाच्या शिखरावर असताना त्याने आपलीली प्रेमिका सुझान सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर ही जोडी बी-टाऊन मधली सर्वात लोकप्रिय जोडी बनली होती.

ह्रतिक आणि सुझान यांचे एकमेकांवरील प्रेम सर्वज्ञात होते. ह्रतिक आणि सुझान यांना लग्नानंतर दोन अपत्ये झाली मात्र सहा वर्षांपूर्वी ह्रतिक आणि सुझान यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला .या दोघांच्या घटस्फोटा मागचे कारण नक्की काय आहे या विषयावर तर्कवितर्क लावले गेले या घटस्फोटासाठी ह्रतिक चे कंगना राणौत आणि बार्बरा मोरी यांची मैत्री हे कारण मानले जात होते.

ह्रतिक आणि सुझान यांनी या सर्व बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया देणे कटाक्षाने टाळले होते. नुकत्याच एका मुलाखतीत सुझानने  त्यांच्या घटस्फोटाला कंगना किंवा बार्बरा मोरी जबाबदार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून त्यांच्यातील परस्पर तणावाचा परिणाम मुलांवर पडू नये यासाठी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा मुलांसाठी हे दोघेही एकत्र येताना दिसतात व त्यांच्यामध्ये अजूनही मैत्रीपूर्ण संबंध आहेत .

कंगना राणावतने  ऋतिक रोशनवर आरोप केले तेव्हा सुजन खान ह्रतिक च्या पाठीशी ठामपणे उभी होती. घटस्फोट झाल्यानंतर ही लॉकडाउनच्या काळामध्ये सुझान आपल्या मुलांसोबत ह्रतिक च्या घरी राहायला आली आहे. ह्रतिक सध्या क्रिश 4 या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे तर सुझानसुद्धा स्वतः एक बिझनेस वुमन आहे.