एखाद्या महालापेक्षा कमी नाही कंगना राणावतचं मनालीमधील घर. घरातील सजावट आणि सुविधांचा वाटेल हेवा

एखाद्या महालापेक्षा कमी नाही कंगना राणावतचं मनालीमधील घर. घरातील सजावट आणि सुविधांचा वाटेल हेवा 

प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपलं घर कसं असावं, त्यात काय सोयीसुविधा असाव्यात याविषयी विचार असतात. स्वप्न असतात. सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यामागे बराच संघर्ष असतो. मात्र श्रीमंत व्यक्तींना असे घर बनवणे किंवा खरेदी करणे सहज शक्य असते. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या या लेखात आपण अशाच एका सेलिब्रिटी अभिनेत्रीच्या आलिशान बंगल्याविषयी आणि त्यातील सजावटीविषयी माहिती घेणार आहोत. ही सेलिब्रेटी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत होय.

कंगना रानावतच्या मनाली येथील घराचे फोटो काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर आले होते. या घरातील अनेक गोष्टींविषयी खास खुलासेदेखील झाले. कंगनाच्या या घराचे नाव ‘मनाली बंगलो’ असे आहे. या घराला बनवण्यासाठी जवळपास एकूण 30 कोटी रुपये इतका खर्च आल्याची माहिती मिळत आहे.

कंगनाची हे घर एखाद्या महालापेक्षा कमी नाही. कंगना मूळची हिमाचल प्रदेशाची असल्यामुळे तिच्या घरामध्येदेखील त्याची झलक आढळते. या घरामध्ये 5 बेडरूम असून कंगनाची स्वतःची एक खास खोली आहे. घरामध्ये केलेला लाकडाचा आणि फर्निचरचा वापर या घराच्या सौंदर्यात भर टाकतो.

या घराच्या सजावटीसाठी इंटेरियर डिझाइनर ऋचा बहलनी मदत केली असून ऋचा दिग्दर्शक विकास बहलची पत्नी आहे. ऋचाने इतरही अनेक सेलिब्रेटींच्या घरातील इंटेरियरचे काम केले असल्यामुळे तिच्या अनुभवाचे फलित कंगनाच्या घरातील सुंदर सजावटीवरून दिसून येते.

कंगनाच्या बेडरूममध्ये क्लासिकल आर्मचेयर आणि जयपुर रग्स कार्पेटसारख्या महागड्या गोष्टींचा समावेश आहे. घरातील भिंतींवर मुंबईच्या चोरबाजारात मिळणारे कस्टमाइज़ पीस लावलेले आहेत. घरात प्रवेश करतो त्याठिकाणी अनेक सजावटीच्या आणि महागड्या वस्तूदेखील आहेत. घरात पाहुण्यांसाठी वेगळी बेडरूम असून यामध्ये देखील सजावटीसाठी अत्यंत सुंदर साहित्य वापरलं गेलं आहे. मनालीव्यतिरिक्त कंगनाचे मुंबईतदेखील घर आहे.