Bollywood

चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे मनोज वाचपेयी यांची लव्ह लाईफ … !

मनोज वाचपेयी हे नाव आज हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वांनाच माहिती आहे . पण आज आपण त्यांच्या वास्तव आयुष्यातील प्रेमकथेविषयी जाणून घेणार आहोत , जी एखाद्या चित्रपटाच्या कथेसमानचं आहे . मनोज यांचा जन्म बिहार मधील चंपारण्य गावानजीक झाला . त्यांचे वडील हे शेती करायचे आणि आई घर सांभाळायची . ते एकूण पाच भावंडांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे आहेत .

तर हे झालं त्यांच्या कुटुंबाविषयी काही … आता जाणून घेऊ त्यांच्या लव्ह लाईफ विषयी , मनोज यांनी दिल्ली मध्ये त्यांचे स्ट्रगल सुरु असताना एका मुलीशी लग्न केले होते . परंतु काही कारणाने ते नातं फार काळ टिकू शकले नाही . अवघ्या २ महिन्यात ते दोघे एकमेकांपासून दूर झाले . ते दोघे दूर होण्याचे कारण त्यांचा स्ट्रगल पिरिअड ठरला असे समजते . हे लग्न टिकू न शकल्याने मनोज एवढे खचले होते , कि त्यांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला . पण नशिबाने त्यांना साथ दिली आणि त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ त्यांच्यापासून हळूहळू दूर होऊ लागला .

सन १९९४ मध्ये मनोज यांना ‘ बँडेड क्वीन ‘ या फिल्मने पहिला ब्रेक मिळवून दिला . त्यानंतर १९९८ मध्ये रिलीज झालेल्या ‘ सत्या ‘ या फिल्म ने त्यांना खरी ओळख मिळवून दिली .  ‘ सत्या ‘  या फिल्मने चित्रपट सृष्टीमध्ये त्यांना नावचं नाही तर त्यांच्या आयुष्याची सहचरणी देखील मिळवून दिली . नाही … , त्यांची पत्नी हि सत्या या फिल्म मध्ये नव्हती तर सत्या ज्या दिवशी रिलीज झाला त्याच दिवशी आणखी एक फिल्म रिलीज झाली ज्याचं नाव होता ‘ करीब ‘  … या फिल्म मध्ये नेहा जिचे मूळ नाव शबाना रझा असे आहे हि अभिनेत्री होती .

फिल्मच्या निमित्ताने दोघे भेटले . आणि सात वर्ष एकमेकांना जणून घेतल्या नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला . २००६ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली … त्यानंतर मनोज वाचपेयी यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये चांगले चित्रपट दिले मात्र नेहाने चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली आहे .