सध्या लाँकडाऊन मुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे सेलिब्रिटी सुद्धा घरामध्ये वेळ व्यतीत करत आहेत. इतर वेळी चित्रीकरण,सोशल इव्हेंटमध्ये व्यस्त असलेले सेलिब्रिटी 24 तास घरात आपला वेळ घालवण्यासाठी निरनिराळे पर्याय शोधत असल्याचे दिसते. काही सेलिब्रिटी साफसफाई करताना दिसत आहेत तर काही जण स्वयंपाक करत आहेत तर काही सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असल्याचे दिसते. काही सेलिब्रिटी मात्र एकांतामध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचे दिसते.

सध्या इंटरनेटवर सेलिब्रिटिंकडून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोज शेअर करण्याचा ट्रेंड आला आहे. यामध्ये काही सेलिब्रिटी चित्रपटसृष्टीमध्ये येण्याअगोदरच्या आपल्या आयुष्यातील मोहक अशा आठवणी सुद्धा शेअर करत आहेत. काहीजण आपल्या शाळेतील लहानपणीचे फोटोज शेअर करून चाहत्यांना एका नव्याच पैलूचे दर्शन घडवत आहेत.

अभिनेत्री राकुल प्रीत हिने कॉलेज जीवनातील मैत्रिणीं सोबत एक फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. या फोटोमध्ये राकूल आपल्या मैत्रिणींसोबत एखाद्या साधारण विद्यार्थिनी प्रमाणे फोटो काढून घेण्यासाठी उभी आहे .या छायाचित्राला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे मात्र विशेष गोष्ट अशी की या छायाचित्रामध्ये राकुल प्रीत हिचे सध्याचे लूक्स पाहता तिला ओळखता येणे सुद्धा कठीण आहे.

इन्स्टाग्राम स्टोरी वर आपल्या मैत्रिणीसोबत शेअर केलेले हे छायाचित्र राकूलला  किती जवळचे आहे हे तिने या छायाचित्राला दिलेल्या कॅप्शन वरुन लक्षात येते. या छायाचित्राला तिने वी आर ग्रोन अप  असे कँप्शन दिले आहे. व यामध्ये तिने आपल्या मैत्रिणींची नावेसुद्धा नमूद केली आहे.

कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना अल्पावधीतच दिग्गज कलाकारां सोबत काम करूनआपल्या अभिनयाची छाप राकूलने निरनिराळ्या चित्रपटांद्वारे सोडली आहे.अभिनयाचे नाणे खणखणीत वाजल्यानंतर सुद्धा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल राकूल नेहमीच प्रसारमाध्यमांनी पासून अंतर राखून असते. राकूल अजुनही सिंगल का आहे  या प्रश्नाचे उत्तर  देताना राकूल सांगते की तिला कधीही अशा नात्याची गरज अजूनपर्यंत तरी भासली नाही व ती अशा प्रकारचे गर्लफ्रेंड बनू शकत नाही की जी संपूर्ण दिवस मोबाईल फोनवर गप्पा मारत चिकटून राहू शकेल.

आपल्या कामाप्रती  अतिशय फोकस्ड असलेल्या राकूलकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. जॉन अब्राहम सोबतच अँटँक या चित्रपटांमध्ये ती  काम करणार असून ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांच्यासोबत इंडियन टू या चित्रपटात सुद्धा ती झळकणार आहे.