Actors Actress Bollywood Celebrities Entertainment National

खरा हिरो! भर पावसात वर्सोवा बीच साफ करण्यासाठी मदत केली ‘या’ अभिनेत्याने

randeep-hooda
randeep-hooda

संपूर्ण भारत आणि जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे चित्रपटांची शूटिंग देखील बंद आहे. अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आपल्या या काळात घरात दिवस घालवत आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा वेगळा ठरला आहे. सध्या त्याचे सोशल मीडियावर एका कारणासाठी मोठ्या प्रमाणात कौतुक  दिसून येत आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. त्याचबरोबर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या वतीने या ठिकाणी स्वछता मोहीम चालू आहे. यामध्ये  अभिनेता रणदीप हुडा वर्सोवा याठिकाणचा समुद्र स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभागी झाला आहे.याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचा मित्र अफरोझ शाह बरोबर या मोहिमेत सहभाग घेतला होता. मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी या मोहिमेत मदत  फोटोंमधून दिसून येत आहे.

मान्सून सुरू झाल्यानंतर समुद्रातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाहेर फेकले जाते. ते उचलताना सफाई कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येतात. अशावेळी असे मदतीचे हात नक्कीच उपयोगी ठरतात.निसर्गाचा आदर करण्यास आपण सुरूवात केली पाहिजे अशा आशयाचे कॅप्शन देत रणदीपने हे फोटो शेअर केले आहेत.यावेळी त्याने आपल्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यानेमास्क आणि ग्लोव्ह्ज परिधान करून त्याने बाहेर पाऊल टाकले होते’घराजवळ असणारा समुद्र मी स्वच्छ करत आहे. आपण जे काही थोडेफार करू शकतो ते करू या’, असं आवाहन यावेळी त्याने केलं.

चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी ज्या प्रकारे तो मेहनत घेतो, ताशाचप्रकारची मेहनत त्याने या ठिकाणी सफाई मोहिमेत देखील घेतली आहे. रणदीप हुड्डा याने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आतापर्यंत भूमिका केल्या आहेत.   

दरम्यान,  मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरूवात केली आहे. त्यानंतर समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर आला आहे.अशावेळी रणदीप हुडाने हे पाऊल उचलल्यानंतर त्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी रणदीपला ‘खरा हिरो’ संबोधले आहे.

About the author

Being Maharashtrian