Articles Bollywood Entertainment Featured

लहानपणी सुपरस्टार सोबत फोटो काढलेली ही मुलं आजच्या घडीला स्वतः आहेत मोठे कलाकार!

भारतामध्ये बॉलीवूडमधील कलाकारांप्रतीचे चाहत्यांचे प्रेम हे एक वेगळेच समीकरण आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याच्या सोबत फोटो काढण्यासाठी, त्याच्याकडून ऑटोग्राफ मिळवण्यासाठी चाहते धडपडत असतात. आपल्या आवडत्या स्टार ची एक झलक मिळाली तर जीवनाचे सार्थक झाले असे मानतात. पडद्यावरील हिरोंना आपला आदर्श मानून अनेक चाहते त्यांच्या प्रमाणे आचरणसुद्धा करत असतात. एखाद्या आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष भेट घेऊन त्याच्या सोबत छायाचित्र काढणे हे तर जणू काही स्वप्नवत आहे कारण यात सुपरस्टारच्या भोवती असलेले बॉडीगार्ड मात्र या सर्व दिव्यातून पुढे जाऊन आपल्या आवडत्या सुपरस्टार सोबत छायाचित्र काढणे ही एक भाग्याची गोष्ट कोणत्याही चाहत्यासाठी असते. मात्र एकेकाळी आपल्या सुपरस्टार सोबत छायाचित्र काढून त्या क्षेत्रामध्ये स्वतः सुद्धा एक यशस्वी कलाकार बनणे हे निश्चितच आपल्या सुपरस्टारच्या आदर्शावर पाऊल ठेवत पुढे जाण्यासारखे आहे.आज आपण अशाच काही स्टारबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची त्यांच्या आवडत्या स्टार सोबतची छायाचित्रे सध्या व्हायरल होत आहेत.

विक्की कौशलः संजू ,राजी, उरी द सर्जिकल स्ट्राइक, मसाण या चित्रपटांमधून अगदी अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेल्या विकी कौशल चे अभिनय कौशल्य निश्चितच वाखानण्याजोगे आहे. सध्या विकी कौशल चा आपल्या लाडक्या सुपरस्टार ह्रतिक रोशन सोबतचा लहानपणी काढलेला एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ह्रतिक रोशन सोबत विकी कौशलची फँन मोमेंट कॅप्चर केली गेली आहे.आज ह्रतिक रोशन प्रमाणेच विकी कौशल सुद्धा तरुणाईचा आदर्श बनला आहे.

सई मांजरेकरः मराठी चित्रपट सृष्टीतील व बॉलिवूडमधील आघाडीचे निर्माता, दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर हिला फिल्मी बॅकग्राऊंड अगदी लहानपणापासूनच होते त्यामुळे सुपरस्टार सोबत भेटणे व छायाचित्र काढणे हे तिच्यासाठी अपूर्वाई ची गोष्ट नव्हती मात्र तरीही तिचे लहानपणीचे दबंग खान सलमान खान सोबतचे छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ती खूपच लहान असून  गोड असे हे छायाचित्र प्रेक्षकांच्या  खूप पसंतीस उतरत आहे .सलमान खान सोबतच सई मांजरेकरने दबंग या चित्रपटातून पदार्पण केले आहे.

रणवीर सिंगः बॉलिवूडमधील आपल्या बिंदास अशा अंदाजामुळे सुपरहिट ठरलेल्या रणवीर सिंग चे अक्षय कुमार सोबत चे लहानपणीचे छायाचित्र खूपच प्रसिद्ध झाले आहे. या छायाचित्रांमध्ये रणवीर सिंग शाळकरी वयामध्ये असून पुढे जाऊन हा मुलगा इतका मोठा सुपरस्टार होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती याची कबुली खुद्द रणवीर सिंग ने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दिली होती. सिंबा, बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारखे सुपरहिट चित्रपटांमध्ये रणवीर सिंग ने काम करून खिलाडी अक्षय कुमारचा आदर्श पुढे चालवला आहे.

अक्षय कुमारः खुद्द अक्षय कुमार खिलाडी कुमारची फँन मोमेंट दारासिंह यांच्यासोबत काढलेल्या एका छायाचित्रा द्वारे उलगडली आहे.आजच्या घडीला सर्वात हिट आणि विविधांगी भूमिका करणारा अभिनेता म्हणून खिलाडी अक्षय कुमार ला ओळखले जाते. अक्षय कुमार यांचे दारासिंह यांच्यासोबत लहानपणीचे छायाचित्र सध्या खूप व्हायरल होत आहे.

दीपिका पादुकोणः भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन या क्षेत्रामध्ये नाव मिळवून देणारे जेष्ठ बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची कन्या असलेल्या दीपिका पदुकोण हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.बॉलिवूडची मस्तानी म्हणून प्रसिद्ध असलेली दिपिका सुरुवातीच्या काळामध्ये मॉडेल म्हणूनही खूप प्रसिद्ध होती मात्र मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्राला सुरुवात करण्यापूर्वी दिपीकाचा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यासोबत काढलेला फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे यामध्ये दीपिका  तिच्या आई-वडिलांसोबत आमिरच्या बरोबरीने दिसत आहे. या फोटोच्या वेळी आमिर खानला दीपिकाच्या घरी जेवणासाठी बोलावण्यात आले होते व त्यावेळी दिपिका अगदीच लहान होती.