Home » अभिमानास्पद …’या’ कारणामुळे मैथिली ठाकूरने बॉलीवूडमध्ये गाण्यासाठी दिला नकार, नेटकऱ्यांनी निर्णयाचे केले स्वागत…
Celebrities

अभिमानास्पद …’या’ कारणामुळे मैथिली ठाकूरने बॉलीवूडमध्ये गाण्यासाठी दिला नकार, नेटकऱ्यांनी निर्णयाचे केले स्वागत…

सध्या गायनाशी निगडित अनेक रियालिटी शो टेलिव्हिजनच्या विविध वाहिन्यांवर प्रसारित होतात.देशाच्या कानाकोपऱ्यातील गायक यामुळे सर्वांसमोर येतात.या शोमध्ये सहभागी झालेले अनेक गायक पुढे बॉलीवूडमधील पार्श्वगायक म्हणून नावारुपास आल्याचीही उदाहरणे आहेत.रियालिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच कलाकारांना पुढे जाऊन बॉलिवुडमध्ये पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध होण्याचे ध्येय असते.

मात्र या सर्व गर्दीमध्ये केवळ आपल्या कलेवर प्रेम करत पारंपारिक गायन व लोक कला पुढे नेण्याचे ध्येय राखणारे गायकही तरुण पिढी मध्ये आहे असे सांगितले तर निश्चितच आश्चर्य वाटेल.मात्र अशी उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत व याचे उदाहरण म्हणजे पारंपारिक गायनाला प्राधान्य देणाऱ्या व बॉलीवूडमधील गाण्यांना ठामपणे नकार देणारी गायिका मैथिली ठाकुर होय. या सुरेल गायिकेच्या आवाजाचे करोडो चाहते आहेत.

मात्र ही गायिका केवळ आपल्या प्रतिभासंपन्न गायकी मुळे नव्हे तर तिने घेतलेल्या एका निर्णयामुळे सुद्धा चर्चेत आली आहे.मैथिलीने बॉलिवूडमधील धर्म आणि देशा अभिमानाला धक्का पोहोचवणाऱ्या गाण्यांना गाण्यास नकार दिला आहे व एकंदरीतच बॉलीवूडमध्ये पार्श्वगायन न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे व या पुढे केवळ पारंपरिक गायकी आणि लोक गायनावर ती भर देणार आहे असेही तिने सांगितले आहे. 

इतक्या कमी वयामध्ये इतका ठाम निर्णय घेणाऱ्या मैथिली ठाकुर विषयी आज आपण जाणून घेणार आहोत...

मैथिली ठाकूर ही एक प्रतिभासंपन्न गायिका आहे.मैथिली ही भोजपुरी हिंदी व अन्य काही भाषांमध्ये खूपच सुंदर गाते.मैथिली चे गाण्याचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात व तिचे सोशल मीडियावरील फॉलोईंग हे करोडोंच्या संख्येने आहे.सध्या मैथिली ठाकूर ही तिच्या गाण्याप्रमाणे तिच्या गायनाच्या संदर्भातील निर्णयामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.मैथिली ठाकुर ने बॉलिवूडमध्ये एन्ट्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडमध्ये पार्श्वगायनात करिअर न करण्याचा ही ठाम निश्चय तिने केला आहे व या दृष्टीनेच बॉलिवूडमधील पार्श्वगायनाच्या अनेक ऑफर्स तिने नाकारल्या आहेत.बॉलीवूड मध्ये पार्श्वगायनाची संधी मिळावी यासाठी अनेक नवोदित गायक व गायिका संगीतकार व दिग्दर्शकांचे उंबरठे अक्षरशः झिजवत असतात.मात्र आपल्या प्रतिभेच्या जोरावर या संधी दारावर चालत आलेली असूनही मैथिलीने त्या नाकारल्या आहेत.या निर्णयामुळे ट्विटरवर तिची अनेक चाहत्यांनी प्रशंसा केली आहे.

ट्विटरवर अनेक चाहत्यांनी मैथिलीच्या या निर्णयाचे स्वागत करून तिचे अभिनंदनही केले आहे. राहुल कुमार नावाच्या एका युजरने बॉलिवूडमध्ये जी गीते लिहिली जातात त्यामध्ये हिंदू धर्म आणि राष्ट्र भावनेचा कायमच अनादर केला जातो व त्यामुळेच मैथिलीने बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन न करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे असे म्हटले आहे.बॉलिवूडमधील पार्श्वगायनाच्या अनेक ऑफर्स येऊनही मैथिलीच्या निर्णयात थोडासाही बदल झाला नाही हे निश्चितच अभिमानास्पद आहे व आम्हाला सर्वांनाच मैथिलीचा अभिमान वाटतो असे या युझरने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या लेखिका शेफाली वैद्य यांनी सुद्धा मैथिलीच्या या निर्णयाचे स्वागत केले असून या इतक्या छोट्या वयामध्ये असा निर्णय घेणे हे निश्चितच धाडसाचे काम केले आहे अशा शब्दांमध्ये तिचे कौतुक केले आहे.अनेक चाहत्यांनी मैथिलीला प्रोत्साहन दिले असून तिच्या गाण्यांचे विविध व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.मैथिली ठाकुरने आपल्याला बॉलिवूडमधील झगमगाट रुचत नाही असे अनेकदा सांगितले आहे.

मैथिलीने तिची बैठक ही शास्त्रीय गायनाची असून आजोबा व वडिल हे तिचे खरे गुरु असल्याचे तिने सांगितले.रियाज चालू असताना जर सूर लागला नाही तर तिची आई  तिला लगेच थांबवते असे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.अशा प्रकारे शास्त्रीय गायन यामध्येच आपले आत्तापर्यंतचे आयुष्य गेल्यामुळे बॉलिवूडमधील शास्त्रीय गायनाला वेगवेगळ्या प्रकारे तोडून मोडून बनवलेल्या गाण्यांमध्ये मला आंतरिक समाधान मिळत नाही असे तिचे मत आहे.

सिता व राम  यांची भजन  इत्यादी गाऊन मला आत्मिक शांती मिळते जी बॉलिवूडमधील गाण्यांमध्ये कदाचित लाभणार नाही असे मैथिलीने सांगितले.बॉलीवूड मधील गाणी ही काही काळानंतर विस्मरणात जातात मात्र शास्त्रीय गायकांना जो आदर व मानसन्मान मिळतो तो नेहमीच चिरंतन असतो म्हणूनच आपण यापुढे लोक संगीत व पारंपरिक गायनाला भर देणार आहोत असे मैथिलीने नेहमीच सांगितले आहे.

About the author

Being Maharashtrian