Home » सलमानखान च्या ह्या अभिनेत्रीने जेव्हा संगळ्यांसमोर छेड काढणाऱ्याला दिला होता चोप, आता अभिनय सोडून करत आहे हे काम
Celebrities

सलमानखान च्या ह्या अभिनेत्रीने जेव्हा संगळ्यांसमोर छेड काढणाऱ्याला दिला होता चोप, आता अभिनय सोडून करत आहे हे काम

भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्री बॉलिवूड  आणि अभिनयाला अलविदा केल्यानंतर राजकारणामध्ये यशस्वीपणे सक्रीय झालेल्या दिसून येतात. नगमा ही अशीच एक अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्याची जादू बॉलिवूड आणि टोलिवूड मध्ये पसरवली होती. ती सध्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. सलमान खानच्या बागी या चित्रपटामध्ये सलमानची नायिका म्हणून झळकलेली नगमा तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

नगमा ही काहीना काही कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहत असे. नामाने केवळ हिंदी नव्हे तर तमीळ, तेलगू ,मल्याळम ,कन्नड ,भोजपुरी यांसारख्या विविध भाषिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे ‌.नगमा ही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अतिशय स्पष्टवक्ती आणि बिनधास्त असून एकदा एका छेड काढणार्‍या व्यक्तीला तिने भर रस्त्यावर चांगला चोप दिल्याचा प्रसंगही घडला आहे.

2014 साली नगमाने  लोकसभेच्या नि व ड णु कांमध्ये उमेदवारी अर्ज भरला होता. या नि वड णुकांच्या प्रचारासाठी नगमा अनेक दौऱ्यामध्ये ही सहभागी झाली होती. अशीच एक जनसभा एका ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जिथे नगमाला पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.नगमा चे जसे या ठिकाणी आगमन झाले गर्दीला नियंत्रणात ठेवणे पोलिसांनाही कठीण जाऊ लागले. सर्वत्र एकच गोंधळ उडाला व लोक एकमेकांवर खुर्च्या फेकून गोंधळ घालू लागले .या सर्व गोंधळामध्ये नगमा शी सुद्धा गैरवर्तन करण्यात आले.

ज्या व्यक्तीने नगमा सोबत गैरव्यवहार केला त्याच्या नगमाने भर सभेमध्ये कानशिलात लगावली व ही सभा ती मध्येच सोडूनही गेली. या सर्व गदारोळा चा व्हिडिओ यावेळी सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. मात्र या निवडणुकांमध्ये नगमाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीच्या निकालांमध्ये नगमा ही चौथ्या क्रमांकावर होती व तिला केवळ 13 हजार 222 इतकी मते मिळाली त्यामुळे  तिचे डिपॉझिट ही जप्त झाले होते.

हा पहिलाच प्रसंग नाही जेव्हा राजकीय मैदानात नगमाला गैरवर्तनाचा सामना करावा लागला आहे या अगोदर सुद्धा एका ठिकाणी स्थानिक आमदाराने नगमा सोबत गैरवर्तन केले होते. मात्र त्यावेळी राजकारणामध्ये नवखी असलेल्या नगमाने या प्रकरणावर शांतपणे पडदा टाकणे पसंत केले होते‌.मात्र आता राजकारणामध्ये स्थिरावलेल्या नगमाने आपल्यावर कोणत्याही प्रकारे केलेल्या अत्याचारावर बिनधास्तपणे प्रतिक्रिया देण्याचे धोरण सध्या स्वीकारल्याचे दिसून येते.