Home » या ‘७’ बॉलिवूड ऍक्टर्सकडे पाहून लक्षात येते की पैसे,प्रसिद्धी एका क्षणात धुळीला मिळू शकते…
Celebrities

या ‘७’ बॉलिवूड ऍक्टर्सकडे पाहून लक्षात येते की पैसे,प्रसिद्धी एका क्षणात धुळीला मिळू शकते…

पैसे,संपत्ती ह्या अश्या गोष्टी आहेत ज्या आपण कितीही कमवल्या तरी आणखी जास्त मिळवण्यासाठी आपली नेहमीच धडपड सुरु असते.आपण आपले संपूर्ण आयुष्य यामध्येच खर्ची घालतो काही जणांना तर कितीही पैसे कमवले तरी सुद्धा समाधान मिळत नाही.खर म्हंटल तर पैशानेच सगळ्या गोष्टी साध्य होतात असे नाही.तर आज आपण अशा बॉलिवूड स्टार बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी केलेल्या एका छोट्यास्या चुकीमुळे त्यांना त्यांचे कष्टाने कमावलेले पैसे,नाव आणि समृद्धी गमवावी लागली ती कशी ते बघूया…

१) अमिताभ बच्चन : 

‘रिश्ते मैं तो हम तुम्हारे बाप लगते हैं’ असे म्हणणारे बॉलिवूडचे ‘शहंशहा’ अमिताभ बच्चन यांना देखील खूप मोठया संकटाचा सामना करावा लागला होता. २००० मधील गोष्ट आहे जेव्हा अमिताभ बच्चन पूर्णपणे कर्जात दुबळे होते.त्यांच्यावर ९० कोटींचे कर्ज होते.त्यांची एबिसिअल बंद होणार होती.त्यांच्याकडे ना विशेष चित्रपट होते ना इतर कोणतेही काम ज्यामधून ते कर्ज फेडू शकेल त्यांच्या घरासमोर कर्जदारांची लांब रांग लागली होती एवढेच नाही तर लोक त्यांना शिवीगाळ करत पैसे परत मिळवण्यासाठी धमकावायचे.

अशावेळी त्यांना केबीसी या शो मध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यांनी या शो मध्ये लोकांना करोडपती होण्याची संधी देत असतांना ते स्वतः देखील त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर होते. केबीसी हा शो त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा बघ आहे आणि नेहमीच राहील असे ते नेहमी सांगत असतात.हा काळ फक्त अमिताभ बच्चनचं नाही तर त्यांच्या पूर्ण बच्चन कुटुंबासाठी खूप वाईट होता स्वतः अमिताभ बच्चन यांनी अनेक मुलाखतीमध्ये याचा उल्लेख केला आहे.

२) शाहरुख खान : हिंदी चित्रपट सृष्टीतील बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान त्यालाच आपण ‘किंग खान’ म्हणून देखील ओळखतो.याला देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.शाहरुख खानने ‘रावण’ या चित्रपटात पैसे गुंतवले होते हा चित्रपट अतिशय खर्चिक होता.यामध्ये शाहरुख खान सुद्धा आर्थिक संकटामध्ये आला होता.’रावण’ हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चुक होती असेही त्याने कबूल केले होते.

३) गोविंदा : हिंदी सिनेमामध्ये राजबाबू म्हणून प्रसिद्ध असलेला गोविंदा याने देखील आर्थिक तंगीचा सामना केला आहे गोविंदा कधीकाळी संपन्नतेपासून खुप दूर होता की कधीकाळी गोविंदाकडे रिक्षा आणि टॅक्सिचे भाडे देण्याइतके सुद्धा पैसे नसायचे.गोविंदा एका प्रीमियम सोहळ्यात मुलाखत देता वेळेस खुप भावूक झाला होता त्याने त्याच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या.

४) शिल्पा शेट्टी कुंद्रा : अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिला देखील आर्थिक गणित न जुळवता आल्यामुळे तिच्यावर देखील आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता.ती स्वतः मालिक असलेल्या ‘राजस्थान रॉयल्स’ स्वतःची जाहिरात करण्याऐवढे सुद्धा पैसे नव्हते. हे शिल्पा शेट्टीने स्वतः कबूल केले होते.

५) राज कपूर : नावाजलेले दिग्दर्शक आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ‘शोमन’ म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांनी स्वतः निर्मित केलेल्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाच्या अपयशामुळे कर्जबाजारी झाले होते.आणि त्याच बरोबर संगम आणि बोंबी या चित्रपटामुळे देखील त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता.

६) जॅकी श्रॉफ : ‘हिरो’ या चित्रपटापासून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली होती.त्यांची लहानपणी खुप गरिबी होती.यशस्वी झाल्यावर देखील त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता त्याच्यावर असलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे त्यांना स्वतःचे घर आणि संपूर्ण मालमत्ता विकावी लागली होती तेव्हा त्यांना सलमानने मदत केली होती.

७) प्रीती झिंटा : प्रीती झिंटाने देखील आर्थिक तंगीचा सामना केला होता तिने स्वतः निर्मित केलेल्या ‘ईश्क इन पॅरिस’ हा चित्रपट अयशस्वी ठरल्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली होती.तेव्हा तिला देखील सलमान खानने मदत केली होती असे म्हंटले जाते.