Home » गौरी खानचे अश्रु अनावर,आर्यन ला अशा अवस्थेत पाहून रडली ढसाढसा…
Celebrities

गौरी खानचे अश्रु अनावर,आर्यन ला अशा अवस्थेत पाहून रडली ढसाढसा…

क्रूझ शिपमधील ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक असलेल्या आर्यन खानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. चार दिवसांपूर्वी या क्रूझवर धाड टाकून ८ जणांना अटक केली आहे.त्यामध्ये आर्यन खानचा समावेश आहे.आज आर्यन खानचा जामीन पात्र मुंबई कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळला आहे.

त्यामुळे त्याला आजचा मुक्काम कोर्टातच काढावा लागणार आहे.त्याचे आईवडील म्हणजे शाहरुख आणि गौरी आर्यनच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.आज गौरी खानचा जन्मदिन आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा फेटाळला.

त्यानंतर गौरी खानचे अश्रु अनावर झाले.तिचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे त्यामध्ये ती रडताना दिसत होती.काही दिवसांपूर्वी आर्यन चा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने फेटाळला होता त्यानंतर आज पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी झाली त्यामध्ये आर्यन ला खुप मोठा धक्का बसला आहे.

त्यानंतर गौरी खानचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे.एनसीबी अधिकारी आर्यनला कोर्टबाहेर आणताना दिसत आहे.समोर एक कार उभी आहे त्यामध्ये गौरी खान रडताना दिसते.बॉलीवूड संबंधित एक वृत्त देणाऱ्या पेजनेत्यांच्या फेसबुकवर शेअर केला आहे.या व्हिडीओ मध्ये गौरी खान ने पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्स मध्ये आहे.

शेवटी आई ती आईच तिचे अश्रु अनावर आले.तिच्या भावनांना बांध फुटलाया व्हिडीओ मध्ये ती रडताना दिसत आहे तिने तीच्या चेहऱ्यावर हात ठेवलेला आहे.कार चालक वारंवार तिच्याकडे बघत होता.थोड्यावेळाने एक महिला त्या कारमध्ये बसली आणि कार निघून गेली.हा व्हिडीओ बघून सोशल मीडियावरील युजर्स खुप भावनिक होत आहे.