Actress Bollywood Entertainment

दिशा पटानीची बहीण दिसते खूपच सुंदर, करते ‘हे’ अभिमानास्पद काम…

Khushboo Patani
Khushboo Patani

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील हॉट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली दिशा पटानी हिच्या मोठ्या बहिणीविषयी माहिती सांगणार आहोत. दिशा पटनीचे बॉलिवूडमध्ये अनेक चाहते आहेत, तुम्हीदेखील तिचे चाहते असाल. मात्र आज आम्ही तुम्हाला तिच्या बहिणीविषयी सांगणार आहोत. यानंतर तुम्ही तिचेदेखील फॅन होणार आहेत.

Khushboo Patani – Being Maharashtrian

दिशा पटनी हिने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘सुशांत सिंह राजपूत’ याच्या बरोबर ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा पहिला चित्रपट केला होता. त्यानंतर सामुर्ण देशात ती लोकप्रिय झाली असून तिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आम्ही आज तुम्हाला तिची बहीण “खुशबू” बद्दल सांगणार आहोत. तिची बहीण खुशबू हि भारतीय सैन्यात असून ती सैन्यामध्ये लेफ्टनंट आहे. या दोघी बहिणींव्यतिरिक्त त्यांना एक भाऊ देखील असून त्याचे नाव सुर्यांश आहे. दिशा देखील आपल्या बहिणीविषयी नेहमी भरभरून बोलत असते.

दिशापेक्षा ती अतिशय साधे जीवन व्यतीत करते. लष्करात असल्यामुळे तिची जीवनशैली साधी असून ती मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास ८१ हजार फॉलोवर्स असून ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. खुशबू देखील आपल्या बहिणीप्रमाणेच सुंदर असून तिने अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. अनेक मुलाखतींमध्ये तिने बहीण आपली प्रेरणा असल्याचे देखील म्हटले होते. त्यामुळे तुम्हाला देखील तिच्या बहिणीच्या अभिमान वाटेल.

दिशा पटनी हिचे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशमधील असून तिचे संपूर्ण शिक्षण तेथेच झाले.तिचे वडील जगदीश सिंह पटानी हे डीएसपी आहेत. त्यामुळे तुम्हाला हि माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट करून आम्हाला प्रतिक्रिया द्या.