Bollywood Entertainment

चित्रपटांमध्ये चुंबनदृश्ये कशी साकारली जातात? अभिनेते, अभिनेत्री खरंच एकमेकांचे चुंबन घेतात का?

चित्रपटांमध्ये चुंबनदृश्ये कशी साकारली जातात? अभिनेते, अभिनेत्री खरंच एकमेकांचे चुंबन घेतात का?

चित्रपट हे आपल्या आयुष्यातील मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. भारतासारख्या देशात तर जगात सर्वाधिक संख्येने चित्रपट बनतात. त्यामुळे आपल्याकडील लोकांना चित्रपटांचे आकर्षण असणे साहजिक आहे. मात्र चित्रपट शौकिनांना फक्त चित्रपटाचेच आकर्षण नसते. त्यांना यासंदर्भातील इतरही अनेक गोष्टींची माहिती जाणून घ्यायची असते. यापैकीच एक गोष्ट म्हणजे चित्रपटात दाखवली जाणारी चुंबनदृश्ये साकारताना अभिनेते, अभिनेत्री एकमेकींना खरंच किस करतात का? ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण याविषयी माहिती पाहणार आहोत.

पूर्वीच्या काळी, म्हणजे अगदीच ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या काळामध्ये चुंबनदृश्ये दाखवायची एक खास पद्धत होती. यामध्ये नायक, नायिका एकमेकांच्या जवळ आले कि अचानक ती फ्रेम जाऊन त्याऐवजी 2 फुलांची भेट झाल्याचे दृश्य दाखवले जात असे. 2 फुलं एकमेकांना बिलगली म्हणजे नायक, नायिकांचे मिलन झाले असा अर्थ प्रेक्षकांना घेता यायचा.

यानंतरच्या काळात, म्हणजेच अगदी ९० च्या दशकातील चित्रपटांमध्ये चुंबनदृश्य दाखवण्यासाठी वेगळी पद्धत वापरली जायची. यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रींच्या पाठीमागच्या बाजूकडून कॅमेरा अशा पद्धतीने चित्रीकरणासाठी लावला जाई कि ते दोघे एकमेकांना किस करत आहेत असे वाटेल. मात्र प्रत्यक्षात अभिनेता आणि अभिनेत्री मान अशा पद्धतीने हलवायचे कि ते चुंबन घेत आहेत असे वाटायचे. वास्तविक त्यांचे ओठ एकमेकांना चिकटलेले नसत.

आताच्या काळात म्हणजेच सध्याच्या चित्रपटांमध्ये अगदी लिपलॉक किस दाखवले जातात. म्हणजे अभिनेते अभिनेत्री एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेतल्याचे दाखवले जाते.हे चुंबन खरे असते का याविषयी अनेकांना माहित नसते. मात्र हे चुंबनदृश्ये साकारताना नायक आणि नायिका बऱ्याच वेळा खरोखर एकमेकांच्या ओठांना किस करतात. अपवादात्मक परिस्थिती क्रोमाच्या साहाय्यानेदेखील ग्राफिक्सद्वारे किसिंग सिन साकारले जातात.