Entertainment Movies

या कारणामुळे इरफान लागत नव्हता स्वतःचे आडनाव!

बॉलीवूड मध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून खूप कमी कलाकार उदयास येतात. खरंच कलेवर प्रेम करणारे, लुक्स किंवा पैसे या पलीकडे जाऊन फक्त अभिनयावर फोकस करणारे अगदी तुरळक असतात! यात इरफान खान हा देखील होते! आज त्यांची जयंती! त्याच्याशी संबंधित एक भन्नाट किस्सा पण आज पाहणार आहोत.

इरफान खानने 29 एप्रिल 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या नंतर अवघ्या 54 व्या वर्षी त्यांना हे जग सोडावे लागले. विविध प्रकारच्या भूमिका केल्या भूमिकेमध्ये जीव ओतला मात्र, असे करताना त्यांनी कधी आपल्या नावापुढे आपले आडनाव लावले नाही.

रॉयल फॅमिली असताना देखील त्यांनी कधीच कुटुंबाचे काही वापरले नाही. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, “मी माझ्या नावातून आडनाव बाजूला केले आहे. मी माझ्या नावाच्या मागचा खान काढून टाकला आहे! मला माझा धर्म किंवा माझे आडनाव किंवा कोणत्याही अशा गोष्टींमुळे ओळख मिळू नये, जी माझ्या पूर्वजांच्या कामामुळे मला मिळाली आहे! लोकांनी मला माझ्या असण्यासाठी ओळखावं असं मला वाटतं आणि म्हणूनच मी माझे आडनाव माझ्या नावापुढे लावत नाही.”

जमिनीशी जोडलेले असणे म्हणजे काय, ते इरफानने त्यांच्या संपूर्ण हयातीत शिकवले. 1988 मध्ये सलाम बॉम्बे चित्रपटात त्यांनी भूमिका केली परंतु नंतर त्यांची भूमिका त्यातून कट करण्यात आली. बरेच संघर्ष पाहिल्यानंतर त्याने यश संपादन तर केलेच! रोग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केले. आणि त्यानंतर शेकडो सुपर डुपर हिट्स देऊन या जगाला अलविदा केले!

About the author

Anuja BM