Bollywood Entertainment

रणबीरच्या या खोडीमुळे नितू सिंग यांना व्हावे लागले होते अपमानित

Ranbir
Ranbir

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय, तरुणींचा हार्ट थ्रोब आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर अशी ओळख असलेला रणबीर कपूर नेहमीच प्रसारमाध्यमांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेला असतो. रणबीर कपूरचे वैयक्तिक आयुष्याबद्लल त्याच्या चाहत्यांनासुद्धा खूप उत्सुकता असते. रणबीरर कपूर हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रमुख कुटुंब असलेल्या कपूर घराण्याचा सदस्य आहे. अगदी सुरुवातीपासून बालपणापासूनच तो फिल्मी पार्श्वभूमी मध्ये वाढला आहे। बालपणी सगळेच मुलं मौजमस्ती खोड्या करत असतात.

शाळेमध्ये तर काही विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या गुणपत्रिकेत केवळ वात्रट , खोडकर हाच शेरा मिळतो. प्रसारमाध्यमांसमोर नेहमीच एक अज्ञाधारक व जबाबदार मुलगा म्हणून ओळखला जाणारा रणबीर सुद्धा याला अपवाद नव्हता. शाळेमध्ये असताना रणबीर कपूर खूप खोड्या करत असे व यामुळे अनेकदा त्याच्या पालकांना व विशेषतः आई नीतू सिंग यांना शरमिंदा व्हावे लागले होते अशी कबुली खुद्द रणबीर यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली.

हा किस्सा प्रसार माध्यमांना सांगताना रणबीरने सांगितले की त्यावेळी त्याचे वय अवघे आठ वर्षांचे होते व त्यांच्या शाळेमध्ये त्याकाळी सर्व शिक्षिका कायम साडी परिधान करत असत फक्त एकच शिक्षिका होत्या ज्या शाळेमध्ये स्कर्ट घालून येत असत.  या शिक्षिकेचे पाय बघण्यासाठी रणबीर  टेबल च्या खाली लपून बसत असे व टेबलाखालून त्यांचे पाय चोरून बघत असे.

ही गोष्ट रणबीर यांच्या शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रणबीरच्या आईला शाळेमध्ये बोलावून घेतले व रणबीरच्या उपस्थितीमध्ये त्याच्या आईकडे तो कशाप्रकारे आपले पाय चोरून बघतो हे सांगितले. ही तक्रार करत असताना रणबीरला आपल्या या कृत्याची खूप लाज वाटली व काही न बोलता तो फक्त खाली मान घालून उभा राहिला मात्र या प्रकारानंतर ही आपल्या खोड्या कमी झाल्या नाही असेही त्यांनी सांगितले.

वर्क फ्रंटवर रणबीर कपूरला सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणले जाते.त्याच्या आगामी प्रोजेक्ट ब्रह्मास्त्र मध्ये आलिया भट सोबत तो. प्रथमच काम करतांना दिसणार आहे. आलिया भट व रणबीर कपूर यांची आँनस्क्रिन.केमिस्ट्री सोबतच आँफस्क्रिन केमिस्ट्री सुद्धा चर्चेत आहे.

रणबीर कपूरला नुकताच पितृशोक झाला आहे. महान अभिनेते ऋषी कपूर हे रणबीरचे वडील होते. ऋषी कपूर यांच्या शेवटच्या काळात रणबीर सतत त्यांच्यासोबत  होता. दोघांमध्ये मित्रत्वाचे नाते होते हे निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी दिसून आले आहे.